Site icon Jan Bharat Samachar

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर सलोख्यासाठी हजरत महंमद पैगंबर जयंती ८ सप्टेंबर ला होणार

Spread the love

पुणे : मुस्लिम धर्मियांसाठी महत्वपूर्ण असलेली हजरत महंमद पैंगबर यांची जयंती यंदाच्या वर्षी ५ सप्टेंबरला असली तरी याच दिवशी गणेश विसर्जन असल्याने धार्मिक सलोखा राखण्यासाठी पैगंबर जयंती ८ सप्टेंबर रोजी साजरी करण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे सिरत कमिटीने घेतला आहे. सुरत कमिटीच्या या निर्णयाचे पुणे पोलिस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांनी स्वागत करत कमिटीचे आभार व्यक्त केले आहे.

आज पुणे पोलिस आयुक्त यांचे समवेत सिरत कमिटी पदाधिकारी यांची संयुक्त बैठक झाली याबैठीत पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे सोबत सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा , पोलिस उपायुक्त भाजीभाकरे व सीरत कमिटीचे मौलाना जमिरुद्दीन , रफिउद्दीन शेख , सिराज बागवान , असिफ शेख , जावेद खान , आबीद सय्यद , अन्सार पिंजारी, मौलाना खालिद निजामी इत्यादी उपस्थितीत होते.

सीरत कमिटीच्या वतिने सकाळी ९ वाजता पारंपरिक मिरवणूक काढन्यात येणार आहे.

Exit mobile version