Site icon Jan Bharat Samachar

पुण्यातील संपूर्ण गदादे कुटुंबीयांचा अवयवदानाचा संकल्प

Spread the love

पुणे : समाजासाठी एक प्रेरणादायी पाऊल उचलत मांजरी येथील संजीव सोशल फाउंडेशन च्या संस्थापिका छाया संजीव गदादे यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह मृत्युपश्चात संपूर्ण अवयव व ऊती दान करण्याचा संकल्प केला आहे. गदादे परिवाराने भारत सरकारच्या ‘राष्ट्रीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संघटना’ कडे यासंदर्भातील शपथपत्र दाखल केले आहे.

महाराष्ट्र शासनाने ३ ऑगस्ट २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ‘अंगदान-जीवन संजीवनी अभियान’ अंतर्गत अवयवदान पंधरवडा जाहीर केला होता. या उपक्रमात अवयव दानाविषयी जनजागृती, गैरसमज दूर करणे आणि नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचविणे यावर भर देण्यात आला.

आपल्या मृत शरीराचा उपयोग इतरांना जीवनदान मिळण्यासाठी व्हावा या भावनेतून सुभाष गदादे, जयश्री गदादे, डॉ. संकेत गदादे आणि छाया गदादे यांनी एकत्रितपणे संपूर्ण देहदानाचा संकल्प केला. भारत सरकारने अवयव दानाची प्रक्रिया सुलभ केल्यामुळे काही मिनिटांतच कोणताही नागरिक अवयवदाता होऊ शकतो. अवयव व नेत्रदानाविषयीच्या गैरसमज दूर करण्याचे कार्य छाया गदादे अनेक वर्षांपासून सातत्याने करीत आहेत.

छाया गदादे म्हणाल्या, भारताची लोकसंख्या प्रचंड असली तरी स्पेन, अमेरिका, फ्रान्ससारख्या देशांच्या तुलनेत अवयव दानाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी पुढे येणे आवश्यक आहे. आमच्या कुटुंबाचा निर्णय निश्चितच समाजासाठी इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल.

Exit mobile version