Site icon Jan Bharat Samachar

महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा अजिंक्यपद सब-ज्युनिअर गटाची फुटबॉल स्पर्धा !!

Spread the love

पुणे, १४ फेब्रुवारीः वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (डब्ल्युआयएफए) यांच्यावतीने आयोजित महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा अजिंक्यपद सब-ज्युनिअर गटाच्या फुटबॉल स्पर्धेत पुणे जिल्हा संघाने रायगड जिल्हा संघाचा २-० असा सहज पराभव करून उपांत्यपुर्व फेरी गाठली.

नांदेड येथील लाल बहादुर शास्त्री महाविद्यालय, धरमदाबाद येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पुणे जिल्हा संघाने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवताना पहिल्या १५ मिनिटांमध्येच दोन गोल नोंदवून आघाडी मिळवली. सहाव्या मिनिटाला हितांश खत्री याने गोल करून पुणे संघाने खाते उघडले. त्यानंतर १८ यार्डावरून हितांश याने मारलेला गोल अचूक ठरला. त्यानंतर जोहान जोसेफ याने ‌‘लाँग शॉट‌’ मारत चेंडू सरळ गोलामध्ये धडवला आणि पुणे संघाला २-० अशी महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात दोन्ही संघाला गोल करण्यात अपयश आले. पूर्णवेळ ही आघाडी कायम ठेवून पुणे संघाने पुढील फेरी गाठली.

या स्पर्धेत अहमदनगर, उस्मानाबाद, कोल्हापुर, वर्धा, भंडारा, बुलढाणा, अकोला, परभणी, अमरावती, नांदेड, रायगड, बीड, नंदुरबार, सोलापुर, नाशिक, सांगली, जालना, नागपुर, गोंदीया, लातुर, चंद्रपुर, रत्नागिरी, धुळे, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील संघ सहभागी झाले आहेत.

स्पर्धेचा सविस्तर निकालः उप-उपांत्यपुर्व फेरीः
पुणे जिल्हा संघः २ (हितांश खत्री ६ मि., जोहान जोसेफ १४ मि.) वि.वि. रायगड जिल्हा संघः ०;

Exit mobile version