Site icon Jan Bharat Samachar

अखिल खडकी कालीमाता उत्सव समितीच्या वतीने कालीमाता उत्सव आयोजित

Spread the love

पुणे : अखिल खडकी कालीमाता उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास पुण्यनगरीचे उपमहापौर माननीय श्री पशुराम वाडेकर साहेब यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली.
तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ), शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्ष माननीय श्री अविनाश कदम, उपाध्यक्ष माननीय श्री निलेश वाघमारे, चिटणीस माननीय श्री सचिन चव्हाण तसेच खडकी छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष माननीय श्री भापकर साहेब यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून समितीच्या कार्याचे मनापासून कौतुक केले व मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान माननीय श्री भापकर साहेब यांनी परिसरातील स्वच्छतेच्या संदर्भातील बाबी *गांभीर्याने घेत तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला व साफसफाईसाठी माणसं पाठविण्याच्या सूचना दिल्या. तसेच परिसरात टाकी व नळ बसवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिसरातील विविध अडचणी व प्रलंबित प्रश्नांविषयी माननीय श्री पशुराम वाडेकर साहेब यांना सविस्तर माहिती दिली. त्यावर श्री वाडेकर साहेबांनी संबंधित प्रश्नांवर लवकरात लवकर कार्यवाही करून मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
उपस्थित सर्व मान्यवरांनी धार्मिक व सामाजिक उपक्रमांद्वारे समाजात एकात्मता, बंधुभाव व सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी समितीच्या कार्याचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी संपूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही दिली.
समितीचे (संस्थापक) अध्यक्ष माननीय श्री रिकेश पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली तसेच उत्सव प्रमुख माननीय श्री कुमार स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमासाठी समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कमिटी सदस्य प्रवीण गायकवाड, विक्रम पिल्ले, रुपेश पिल्ले, संदीप तायडे व संजय पिल्ले यांनी विशेष परिश्रम घेतले.
अखिल खडकी कालीमाता उत्सव समितीच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

Exit mobile version