Site icon Jan Bharat Samachar

विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिर वढू खुर्दला उत्साहात सांगता

Spread the love

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग लोहगाव राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिर २०२५ – २६ वढू खुर्द गाव येथे शिबिराची सांगता विविध उपक्रमांनी उत्साहात झाली. शिबिराचे उद्घाटन वढू खुर्द गावचे सरपंच महेंद्र खांदवे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. तर सांगता शिबिरात विशेष जनजागृती करीत झाली.
या विशेष शिबिरात शाश्वत विकासासाठी युवक पाणलोट व पडीकक्षेत्र व्यवस्थापन अंतर्गत वढू खुर्द डोंगर पायथ्यालगत सलग सम पातळी चर, वनराई बंधारे, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन तसेच ग्रामपंचायत परिसर स्वच्छता अभियान, स्मशानभूमी परिसर स्वच्छता अभियान, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स्वच्छता अभियान व प्रबोधन पर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, नदी स्वच्छता अभियान, रस्त्यालगत वृक्षारोपण, लोकसंख्या जनजागृती अभियान, व्यसनमुक्ती जनजागृती अभियान, हुंडा पद्धती प्रतिबंध जनजागृती अभियान, निसर्ग संवर्धन अभियान, प्रभात फेरी व भित्तीचित्रण द्वारे जनजागृती अभियान, गावातील सार्वजनिक व्यायाम शाळा येथे स्वच्छता व वृक्षरोपण, सर्व शिक्षा अभियान आदी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले.
शिबिर कालावधीत अजिंक्य डी वाय पाटील समूहाचे उपाध्यक्ष डॉ एकनाथ बी खेडकर यांनी व्यक्तिमत्व विकास,ए आय एस एस एम एस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजना पुणे जिल्हा समन्वयक डॉ नाना शेजवळ यांनी शाश्वत विकासासाठी युवक :पाणलोट व पडीकक्षेत्र व्यवस्थापन, मॉडर्न औषध शास्त्र महाविद्यालयातील प्रा श्री रोहित गुरव यांनी प्रेम, मैत्री व आई- बाबा, जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांचे जलसंवर्धन अभियान आदींचे प्रबोधनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिर कालावधीत अजिंक्य डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉ भाग्यश्री ढाकूलकर, डॉ कांचन वैद्य, डॉ एस एम खैरनार,डॉ पल्लवी खरात, डॉ जगन्नाथ गावंडे, डॉ प्रमोद वढते, डॉ निलेश माळी, डॉ नागेश शेळके, श्री गोरखनाथ देशमुख व महाविद्यालयातील सर्व विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आदींनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरार्थी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत प्रोत्साहित केले.
अजिंक्य डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ फारुख सय्यद, संस्थेच्या कार्यकारी उपाध्यक्ष डॉ कमलजीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिर झाले. शिबिर कालावधीत समाजपयोगी व नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबविल्याबद्दल अजिंक्य डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सल्लागार डॉ सुशांत पाटील व उपाध्यक्ष डॉ एकनाथ खेडकर आदींनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांचे विशेष कौतुक केले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी रा. से. योजनतेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. दिलीप बाळासाहेब घुले, शिक्षक प्रतिनिधी प्रा. श्रद्धा खंदारे, प्रा. अमृता मोरे, विद्यार्थी प्रतिनिधी उत्कर्ष पाटील, अनिकेत गायकवाड, दिनेश नगरे, महेश गिरी, सनी पाटील,आदित्य कोनकेवाढ, प्रथमेश माने, निखिल, समर्थ गलांडे, पुजा, प्रणवी, नंदिनी, जानवी, रोहन तुर्डे, सुदर्शन, अभिषेक, रवीरंजन, प्रसन्ना आदींनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिर उत्साही आनंदी वातावरणात सामाजिक बांधिलकी जपत झाले.

Exit mobile version