Jan Bharat Samachar

जवानांच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंद पाहून मन समाधानाने भरुन आले- ना. चंद्रकांतदादा पाटील

Spread the love

होळी म्हणजे केवळ रंगांची उधळण नसून, ती मनामनातील दुरावा मिटवून नात्यांमधील ओलावा जपण्याचा सण आहे. आयुष्यातील सर्व दुःख आणि चिंता विसरून आनंदाच्या रंगात न्हाऊन निघणे, हेच या सणाचे खरे सार्थक! राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या सणाचा द्विगुणित आनंद सीआयएसएफ (CISF) च्या जवानांसोबत साजरा केला.

देशाच्या कानाकोपऱ्यातून, वेगवेगळ्या राज्यांतून आलेले हे जवान आज खऱ्या अर्थाने माझ्या कुटुंबाचाच एक अविभाज्य भाग बनले आहेत. घरापासून मैलोन् मैल दूर राहून दिलेली जबाबदारी चोख बजावणाऱ्या ‘वर्दी’तील भावांच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंद पाहून मन समाधानाने भरून आले, अशी भावना ना. पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

Exit mobile version