Site icon Jan Bharat Samachar

संविधान जागर अभियानातर्फे आळंदीत महिला दिन उत्साहात; ‘आदर्श सासू-गुणी सून’ उपक्रमास दाद

Spread the love

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील आळंदी शहर संविधान जागर अभियान आणि विविध सेवाभावी सामाजिक संस्था, भाग्यश्री मंगल कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन विविध सामाजिक उपक्रमांनी सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्रमांनी महिलांचा सन्मान करीत उत्साहात साजरा करण्यात आला.
जगातील महिला दिना निमित्त भाग्यश्री मंगल कार्यालयात आदर्श सासू – गुणी सून’ या अनोख्या उपक्रमासह विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव सन्मानपत्र, श्रीफळ, स्नेहवस्त्र, गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
संविधान जागर अभियान आळंदी शहर यांचे वतीने तीर्थक्षेत्र आळंदी परिसरात सामाजिक बांधिलकीतून कार्यरत गुणवंत, कर्तृत्ववान महिलांचा सन्मान उत्साहात करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिलांचा सन्मान प्रमाणपत्र, श्रीफळ, स्नेहवस्त्र आणि गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. या मध्ये नगरसेविका साक्षी कुऱ्हाडे पाटील, डी. वाय. पाटील आळंदी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल लोहकरे पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी अभिलाषा वाघमारे, मुख्याध्यापिका शोभा पवार, माजी
मुख्याध्यापिका संगीता वाघमारे, डॉ. महिला प्रतिनिधी सविता कुटे, कीर्ती घुंडरे पाटील, सुवर्णा काळे यांचे सह मान्यवर महिलांचा समावेश होता. या वेळी ‘उत्सव नात्यांचा’ अंतर्गत आदर्श सासू आणि गुणी सून यांचा ही विशेष सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी आळंदी शहर संविधान जागर अभियान प्रमुख अर्जुन मेदनकर, आळंदी जनहित फाउंडेशनचे सचिव रामदास दाभाडे, बाबासाहेब भंडारी, कैवल्य टोपे, संकेत वाघमारे, धीरज कांबळे, विलास वाघमारे, गौतम पाटोळे, संकेत वाघमारे, श्रुतिका मेदनकर आदी उपस्थित होते. संयोजक अनिता झुजम, सुवर्णा काळे, किर्ती घुंडरे आणि संगीता वाघमारे यांनी केले.
विविध उपक्रमांनी रंगला सोहळा या मध्ये कार्यक्रमाची सुरुवात श्रींचे प्रतिमा पूजन, श्री विठ्ठल रुक्मिणी पूजन करीत झाली. डी. वाय. पाटील आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल लोहकरे पाटील यांनी महिलांना आरोग्य विषयक मोलाचे मार्गदर्शन केले. त्या नंतर रंगपंचमीचे औचित्य साधून सर्व महिलांनी एकमेकींना गुलाल लावून ‘रंगोत्सव’ साजरा केला. तसेच महिलां साठी हळदी-कुंकू, प्रश्न मंजुषा आणि संवाद असे विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. कवी अनिल नाटेकर यांनी सादर केलेल्या महिला दिन विशेष कविता आणि गायनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. आळंदी शहर संविधान जागर अभियान सदस्य अर्जुन मेदनकर यांनी परिश्रम पूर्वक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. प्रास्ताविक संगीता वाघमारे यांनी केले. अभिलाषा वाघमारे यांनी आभार मानले. शिवभक्त कैवल्य टोपे यांनी ‘शिववंदना घेत सोहळ्याची सांगता झाली.

Exit mobile version