Site icon Jan Bharat Samachar

नववी ‌‘इन्फोसिस करंडक‌’ कॉर्पोरट टी-२० क्रिकेट २०२६ स्पर्धा !!

Spread the love

पुणे, २० एप्रिलः इन्फोसिस आयआरसी समिती तर्फे आयोजित नवव्या ‌‘इन्फोसिस करंडक‌’ कॉर्पोरट टी-२० क्रिकेट स्पर्धेत कॉग्निझंट आणि टाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेस संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

हिंजेवाडी येथील इन्फोसिस मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत वेगवान गोलंदाज कपिल कुर्लेकर याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर कॉग्निझंट संघाने टेक महिंद्राचा ५ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या टेक महिंद्रा संघाला २० षटकात ११५ धावा धावफलकावर लावता आल्या. कार्तिक पाडेकर याने सर्वाधिक ३१ धावांची खेळी केली. कॉग्निझंटच्या कपिल कुर्लेकर याने १९ धावांत तीन गडी बाद केले. दुसऱ्या बाजुने कुलदीप राठोड, आनंद कोंडा आणि ओमकार गायकवाड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून शिस्तबद्ध गोलंदाजी केले. हे लक्ष्य कॉग्निझंटने १५.३ षटकात व ५ गडी गमावून पूर्ण केले. आकाश निरंजन (४७ धावा), संदीप राज (नाबाद ३१ धावा) आणि ओमकार गायकवाड (नाबाद १८ धावा) यांनी संघाचा विजय सोप केला.

साईनाथ शिंदे याने केलेल्या धावांच्या मदतीने टाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेस संघाने झोरिंयट संघाचा ६ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या झोरियंट संघाचा डाव ९५ धावांवर रोखला गेला. चेतन भांगळे (२७ धावा) आणि अंकित ठाकरे (२१ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. आर्यन भारव्दाज्‌‍, मिन्हाज अली आणि कुणाल सपाटे यांनी अचूक गोलंदाजी करून प्रत्येकी दोन गडी बाद केले. साईनाथ शिंदे (४१ धावा), विक्रांत बांगर (२१ धावा) आणि प्रविण कुमार (१७ धावा) यांच्या फलंदाजीच्या मदतीने हे लक्ष्य टाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेसने ११ षटकात पूर्ण केले.

सामन्यांचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
टेक महिंद्राः २० षटकात ९ गडी बाद ११५ धावा (कार्तिक पाडेकर ३१, अझहर शेख १८, कपिल कुर्लेकर ३-१९, कुलदीप राठोड २-१२, आनंद कोंडा २-१५, ओमकार गायकवाड २-२२) पराभूत वि. कॉग्निझंटः १५.३ षटकात ५ गडी बाद ११७ धावा (आकाश निरंजन ४७, संदीप राज नाबाद ३१, ओमकार गायकवाड नाबाद १८, मनजीत सिंग ३-५); सामनावीरः कपिल कुर्लेकर;

झोरियंटः २० षटकात ९ गडी बाद ९५ धावा (चेतन भांगळे २७, अंकित ठाकरे २१, आर्यन भारव्दाज्‌‍ २-७, मिन्हाज अली २-९, कुणाल सपाटे २-१७) पराभूत वि. टाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेसः ११ षटकात ४ गडी बाद ९९ धावा (साईनाथ शिंदे ४१, विक्रांत बांगर २१, प्रविण कुमार १७, चेतन आंबुळकर १-८); सामनावीरः साईनाथ शिंदे.

Exit mobile version