Site icon Jan Bharat Samachar

समस्त ब्राह्मण संघातर्फे सामूहिक उपनयन सोहळा

Spread the love

पुणे : समस्त ब्राह्मण संघ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ओंकारेश्वर मंदिर येथे आज सामूहिक उपनयन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात एकूण ३० बटू सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या वर्षी ३ मुलींचाही समावेश करण्यात आला.

हिंदू धर्मपरंपरेनुसार उपनयन हा १६ संस्कारांपैकी अत्यंत महत्त्वाचा संस्कार मानला जातो. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरेला पुढे नेत, सर्व जाती व घटकांतील मुला-मुलींना एकत्र आणण्याचा प्रयत्न या सामूहिक सोहळ्यातून करण्यात आला. या माध्यमातून शिक्षण, संस्कार आणि ब्रह्मचर्याचे पालन करण्याचा संकल्प सहभागी विद्यार्थ्यांनी यावेळी केला.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सर्वसमावेशक व प्रगत विचारांना अनुसरून, समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

सचिन टापरे, विजय पाठक, तेजस पाठक, रीमा कुलकर्णी, स्वाती पाठक, प्रज्ञा कापरे, अभय देशपांडे, हेमंत ढवळे, सुनील शिरगावकर आणि विराज जोशी यांचे या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनात विशेष योगदान लाभले.

Exit mobile version