Site icon Jan Bharat Samachar

‘प्रधानमंत्री सूर्यघर’ योजनेच्या प्रसारासाठी महावितरणचा पुढाकार : शुक्रवारी पुणे परिमंडलात एकाच दिवशी मेळावे

Spread the love

पुणे,दि मे२०२६:- केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ घराघरांत पोहोचवण्यासाठी महावितरणच्या पुणे परिमंडलाने कंबर कसली आहे. शुक्रवारी रास्ता पेठ शहर मंडल, गणेशखिंड शहर मंडल आणि पुणे ग्रामीण मंडलातील सर्व उपविभाग व शाखा कार्यालयांतर्गत महावितरणचे वीज कर्मचारी थेट गृहनिर्माण संस्थांमध्ये जाऊन या योजनेचा प्रसार करणार आहेत.

पुणे परिमंडलात आतापर्यंत ३४३१२ ग्राहकांनी सूर्यघर योजनेचा लाभ घेतला आहे. त्याची क्षमता १७० मेगावॉट इतकी असून सूर्यघर योजनेमुळे या ग्राहकांचे वीजबिल शून्यवत झाले आहे. केंद्र सरकार सूर्यघर योजनेसाठी १ किलोवॅट प्रकल्पाला ३०,००० रुपये, २ किलोवॅट प्रकल्पासाठी ६०,००० रुपये तर ३ किलोवॅट किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८,००० रुपये इतके अनुदान देत आहे. एका किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पातून दरमहा सरासरी १२० युनिट वीज तयार होते. सूर्यघर प्रकल्पासाठी राष्ट्रीयकृत बँकांकडून ९० टक्क्यांपर्यंत कर्ज सुद्धा मिळते.

चौकट :

प्रधानमंत्री-सूर्यघर योजनेला वीजग्राहकांपर्यत पोहोचविण्यासाठी वीज कर्मचारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जाऊन माहिती पत्रके वाटतील आणि ग्राहकांना मिळणाऱ्या भरघोस अनुदानाची माहिती देऊन योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करतील.

सुनिल काकडे, मुख्य अभियंता, महावितरण, पुणे

Exit mobile version