Site icon Jan Bharat Samachar

एमआयटी एडीटी’ विद्यापीठामध्ये ‘भारत-जपान फ्युजन फॅशन शो’ उत्साहात 

Spread the love

पुणे .येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नोलॉजी विद्यापीठात नुकताच बहुप्रतीक्षित भारत-जपान फ्युजन फॅशन शोचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात “आपली सांस्कृतीक परंपरा जपा, शान वाढवा” या विषयांतर्गत भारतीय आणि जपानी परिधान परंपरेचे संमिश्र प्रदर्शन झाले. ज्यामध्ये पारंपरिक भारतीय साडी आणि जपानी किमोनो यांचा समन्वयाने आधुनिक वेगळेपणा जपणाऱ्या फॅशनेबल कपड्यांचे प्रदर्शन दाखविले गेले. हे सर्व पोषाख विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी परिधान करून त्यांनी फॅशन शोमध्ये सहभाग घेतला.

याप्रसंगी, विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, अधिष्ठाता डाॅ.मिलिंद ढोबळे, डाॅ.आनंद बेल्हे, कॅप्टन प्रेरित मिश्रा, डाॅ.अतुल पाटील, प्रा.पद्माकर फड आदी मान्यवर उपस्थित होते.

पुण्यात अशाप्रकारच्या कार्यक्रम तथा फॅशन शोचे पहिल्यांदा आयोजन झाल्याने त्याला विद्यार्थ्यांसह विद्यापीठातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय-जपानी वस्त्रकलेचा एक वेगळा अविष्कार पाहावयास मिळणार आहे. फॅशन शोमध्ये जपानी डिझायनर काजुको बारिसिक यांनी तयार केलेल्या खास संग्रहाचे सादरीकरण झाले आहे. या संग्रहात पुनर्नवीनीकृत किमोनो कापडांचा भारतीय डिझाइनसोबत असलेला संगम पाहायला मिळाला. याशिवाय, भारत-जपान संबंध तज्ञ टोमियो इसोगाई यांनी जपानमधील करिअर संधींबाबत मास्टरक्लास आयोजित करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यामुळे, या कार्यक्रमामुळे सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून देखील विद्यार्थ्यांना समृद्ध अनुभव मिळाला.

Exit mobile version