Jan Bharat Samachar

सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे निवडणुकीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Spread the love

पुणे. खडकवासला विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारसंघात नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे प्रशिक्षण सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे आयोजित करण्यात आले.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, मतदारसंघाच्या प्रशिक्षण कक्षप्रमुख तुषार राणे, संजय भोर आदी उपस्थित होते.

डॉ. माने यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मतदार यादी अद्ययावत करण्याच्यादृष्टीने अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे मतदान केंद्रावर करण्यात येणाऱ्या किमान सुविधांनुसार कार्यवाही करावी, मतदार ओळख चिठ्ठीचे वेळेत वितरण करावे, अशा सूचना डॉ. माने यांनी केल्या.

प्रशिक्षक . राणे आणि . भोर यांनी मतदानाच्या दिवशी करावयाचे नियोजन, संपर्क आराखडा, स्वीप उपक्रमाअंतर्गत मतदार जनजागृती, मतदार चिठ्ठीचे वितरण, आदर्श आचार संहितेचे पालन, मतदार यादी अद्ययावतीकरण आदीबाबत माहिती दिली. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या भूमिका, निवडणुकीच्या दरम्यान येणाऱ्या आव्हानांविषयी माहिती दिली.

 

Exit mobile version