आलंदी ( अर्जुन मेदनकर ) : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमे अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने आळंदी परिसरातील 19 केंद्र वर बस पोलिओचे लसीकरण करण्यात आले याच पालकांनी मोठा प्रतिसाद देत आपल्या बालकांना घेऊन लसीकरणासाठी येऊन लसीकरण करून घेतले आळंदी येथील आयोजित लसीकरण मोहिमेची पाहणी करण्यासाठी अतिरिक्त संचालक डॉ संदीप सांगळे, SMO डॉ चेतन खाडे यांनी ग्रामीण रुग्णालय आळंदी आणि माऊली मंदिर पोलिओ बूथ केंद्र येथे भेट देऊन कामकाजाची माहिती घेत संवाद साधला.या वेळी आळंदी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ उर्मिला शिंदे यांचे सह नियुक्त कर्मचारी, आरोग्य सेवक उपस्थित होते. आळंदी खेड आणि आळंदी हवेली भागातील १९ केंद्रावर लसीकरणाची सोय करण्यात आली होती. परिसरातील उद्दिष्ट पेक्षा जास्त लसीकरण करण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी सांगितले. उत्साहात लसीकरण अभियान राबविण्यात आले. आळंदी नगरपरिषद उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर, कालिदास तापकीर, रुग्ण हक्क समिती सदस्य डी. डी. भोसले पाटील, ग्लोबल समाज सहाय्यक समितीचे मार्गदर्शक रामचंद्रकाका कुऱ्हाडे पाटील, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, गोविंद ठाकूर आदी मान्यवर यांनी सदिच्छा भेट देत मुलाना पल्स पोलिओ डोस देत, कामाची माहिती घेत पाहणी केली. लसीकरण दिनी 6 हजार 258 लाभार्थ्यांचे उद्दीष्ट होते. यात 6 हजार 134 लाभार्थ्यांना लस पाजण्यात आली. sunare 98 टक्के काम लसीकरण दिनी सर्व केंद्र मिळून झाले. असे डॉ. उर्मिला शिंदे यांनी सांगितले.
आळंदीत पल्स पोलिओ मोहिमेच्या लसीकरणास उत्साही प्रतिसाद

