Site icon Jan Bharat Samachar

 गुलाबो गॅंग तर्फे प्रभू श्रीरामांना साकडे; अयोध्येतील कथित देणगी व दागिन्यांच्या गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि लवकरात लवकर चोर पकडले जावे यासाठी साकडे घातले.

Spread the love

पुणे :  आम्ही गुलाबो गॅंगच्या वतीने भवानी पेठ येथील दत्त मंदिरातील श्रीराम दरबारात प्रभू श्रीरामचंद्रांची विधिवत आरती केली,यावेळी अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित देणगी, दागिने, सोने-चांदी, हिरे-जवाहर तसेच सोन्या-चांदीच्या विटांच्या चोरी,गैरव्यवहार,आणि सर्व चढावा गायब झाल्याच्या बाबतीत निष्पक्ष, सखोल आणि पारदर्शक चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, आणि ते सर्व चोर कितीही मोठे असले तरी ते पकडले जावे यासाठी प्रभू श्रीरामांच्या चरणी साकडे घातले.
गुलाबो गॅंगच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अयोध्येतील श्रीराम मंदिरात दररोज लाखो म्हणजे कमीत कमी रोजचे अडीच लाख भाविक दर्शनासाठी येतात आणि आपल्या श्रद्धेनुसार रोख रक्कम, सोने, चांदी, दागिने व इतर मौल्यवान वस्तू अर्पण करतात. तसेच मंदिर निर्माण च्या वेळेस लाखो सोन्याच्या आणि चांदीच्या विटा ज्या प्रभू रामचंद्र चरणी अर्पण केल्या गेल्या होत्या त्याही गायब झाल्यात. त्यामुळे या कथित गैरव्यवहारामागील सत्य जनतेसमोर यावे आणि दोषी कोणतेही असोत, त्यांना कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी, अशी सर्व रामभक्तांची अपेक्षा आहे.
या आरती व प्रार्थना कार्यक्रमाला संजय बालगुडे, शोभा पणीकर, सोनिया ओवाळ, निकिता ताई, अशोक चव्हाण आणि बाळू चव्हाण यांच्यासह गुलाबो गॅंगचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..
कृपया प्रसिद्धी द्यावी.

Exit mobile version