Jan Bharat Samachar

अयोध्या श्रीराम मंदिर देणगी अपहार प्रकरणी शिवसेने तर्फे जाहीर निषेध

Spread the love

अयोध्या श्रीराम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहार विरोधात
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षा तर्फे आळंदीत केंद्र, राज्य सरकार चा तीव्र निषेध

आळंदी, ( अर्जुन मेदनकर ) : येथील शिवतेज मित्र मंडळ गणेश मंदिर चौकात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे वतीने गणेश आरती, पसायदान, राम रक्षा संशोधन करण्यात आले. सांगता त्या नंतर आवेकर भावे रामचंद्र संस्थान श्रीराम मंदिर येथे श्रीचे मनोभावे दर्शन घेतले. मंदिराचे विश्वस्त अर्जुनराव मेदनकर यांचे हस्ते वतीने सर्व उपस्थिताना राम रक्षा स्तोत्र पुस्तक वाटप करण्यात आले. आळंदी शिवसेना ( उबाठा ) गटाचे वतीने निषेध आंदोलन करण्यात आहे. अयोध्या येथील राम मंदिर येथील तीजोरीवर डल्ला मारणारे यांच्या विरोधात जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

यावेळी उपस्थित आळंदी पंचक्रोशीसह खेड तालुक्यातील सर्व शिवसैनिक, पदाधिकारी यांनी जोरदार निषेध व्यक्त करीत केंद्र, राज्य सरकारचे कामकाजावर ताशेरे ओढले. यावेळी शिवसेनेचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात ज्येष्ठ कडव्या शिवसैनिक विजयाताई शिंदे यांनी कडक शब्दात क्रेद्र व राज्य सरकार यांच्या वर ताशेरे ओढले. राम मंदिर अयोध्या येथील मंदिरातील देणगी अपहार घटने प्रकरणी समाचार घेतला. मंदिराचे खजीनदार पुण्यातील विश्वस्त, दोषी यांचेवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. मंदिराचे खजीनदार यांचे कार्य पद्धतीवर समाचार घेतला. या वेळी तिव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. उपस्थित खेड तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, विविध अंगीकृत विभागांचे पदाधिकारी यांची जोरदार निषेध करणारी भाषण झाले. उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव वर्पे शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे वतीने राममंदिर अयोध्या येथील तीजोरीवर डल्ला मारणारे यांच्या विरोधात जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला आहे. खेड तालुका खरेदी विक्री संघ संचालक किरणजी लोखंडे, हिरामण लोखंडे, दत्ता हारदे, रोहिदास जाधव, सार्थक गोडसे, उपजिल्हाप्रमुख सचिन गावडे, महिला जिल्हा अध्यक्ष विजयाताई शिंदे ,सह संघटक लक्ष्मणराव जाधव, शिवदुत सचिन राक्षे , उपविभाग प्रमुख मधुकरराव शिर्के, तानाजी गाढे, काळुराम थोरवे, अमोल पठारे विभाग प्रमुख,नंदाताई धायबर, सल्लागार विश्वास नेहरे, भानुदास येळंवडे, ज्योतीरादित्य लोखंडे, उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख अनिताताई झुजम, शोभा कुलकर्णी, कल्याणी मालप, साविञा घुंडरे, विमल मुसळे, लता वर्तले, सविता कांबळे, शैला तापकीर, सरस्वती भागवत, सुरेखा काळभोर, उपतालुकाप्रमुख नंदाताई धायबर, संघटक आनंदराव मुंगसे पाटील, शशीकांत राजे जाधव, गणेश नेटके, मंगेश तिताडे, मनोज पवार, निखिल तापकीर, आशिष गोगावले, श्रीपाद सुर्वे, ओंकार इंगळे, जयहरि डिवरे, चारुदत्त रंधवे, संजय शेठ वडगावकर, विलास कुऱ्हाडे पाटील, नेते उत्तमराव गोगावले, विजय राजने, हनुमंत थोरवे, सचिन तापकीर, माजी सरपंच काळूराम थोरवे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version