Site icon Jan Bharat Samachar

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे महापालिकेच्या ‘स्वच्छता अभियान सप्ताह’चा बोपोडी येथे शुभारंभ

Spread the love

पुणे : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वच्छता अभियान सप्ताह’ उपक्रमाचा औंध क्षेत्रीय कार्यालयामार्फत बोपोडी येथे  उत्साहात शुभारंभ करण्यात आला. सकाळी ७ वाजता आयोजित कार्यक्रमात पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभियानाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी प्रभाग समिती अध्यक्षा रोहिणी चिमटे, सन्माननीय सभासद बाबुराव चांदेरे, अमोल बालवडकर, सनी निम्हण, भक्ती  गायकवाड तसेच औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विजय नायकल यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

अभियानाच्या शुभारंभानंतर उपस्थित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी स्वतः झाडू हाती घेत परिसराची स्वच्छता केली. स्वच्छता ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश देत नागरिकांनी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

‘स्वच्छता अभियान सप्ताह’ अंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार असून, नागरिकांचा व्यापक सहभाग मिळावा यासाठी पुणे महानगरपालिकेकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.

Exit mobile version