Site icon Jan Bharat Samachar

दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार स्मृती स्वच्छता अभियानांतर्गत प्रभाग क्र. ८ मध्ये स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार स्मृती स्वच्छता अभियान अंतर्गत आज प्रभाग क्रमांक ८ मधील मानाजी बाग ते गेट क्रमांक २० या परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
आज सकाळी ७.०० वाजता पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी स्वतः उपस्थित राहून स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेतला.त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत परिसराची स्वच्छता करत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली.

यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी सांगितले की, “स्वच्छ आणि निरोगी शहर घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. स्वच्छता ही केवळ महानगरपालिकेची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे. आपण सर्वांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करून ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ या संकल्पनेला बळ द्यावे.”
या अभियानात आरोग्य विभागातील सर्व स्तरांवरील अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.शहरातील विविध भागांमध्येही अशाच प्रकारे स्वच्छता मोहिमा राबविण्यात येत असून, नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपला परिसर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

Exit mobile version