दिगंबर महाराज नरवडे यांची सुश्राव्य कीर्तन सेवा
विश्व प्रार्थना पसायदान संसदेत लावण्याची मागणी :- डॉ. नंदकिशोर एकबोटे
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : ‘भारतीय सैन्य कारगिल विजय दिवस’ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात कारगिल युद्धात ज्यांनी आपले दोन्ही पाय गमावले असे माजी सैनिक (नायक) संदीप इंदलकर, पुरातत्वाचे अभ्यासक, भारतीय संस्कृती संरक्षण संस्थान, पुणे कार्यवाह डॉ. नंदकिशोर शशिकला रमाकांत एकबोटे यांच्या विशेष उपस्थितीत विविध कार्यक्रमांनी हरिनाम गजरात साजरा करण्यात आला.
भारतीय संस्कृती संरक्षण संस्थान द्वारा कारगिल विजय दिवस भारतीय सैनिकांना मानवंदना देत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर तुळशीहार व पुष्पवृष्टी करत साजरा करण्यात आला. या निमित्त ह.भ.प दिगंबर महाराज नरवडे यांचे माऊली मंदिरातील विनामंडपात कीर्तन सेवा झाली.
या वेळी डॉक्टर नारायण महाराज जाधव, भारतीय संस्कृती संरक्षण संस्थान संस्था कार्यवाह डॉ. नंदकिशोर एकबोटे, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था सचिव अजित वडगावकर, दिगंबर महाराज नरवडे, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, निवृत्ती महाराज साठे विठ्ठल आनंद गिरी महाराज नायक सेवानिवृत्त संदीप इंदलकर, रवींद्र महाराज जोशी, सेवानिवृत्त नायक सुभेदार दत्तात्रय पोतदार, श्रींचे पुजारी प्रफुल्ल प्रसादे, दशरथ चवरे नाईक सुभेदार सेवानिवृत्त धनेश्वर बोस कॅप्टन सेवानिवृत्त बाळासाहेब आढाव, अजित बगाटे ,राजेंद्र महाराज जाधव, ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे विश्वंभर पाटील, गोविंद ठाकूर, हमीद शेख, राजेश नागरे, व्यवस्थापक माऊली वीर, ओंकार ताठे, सागर सर्जेराव,प्रशांत निंबाळकर,खंडू खेडकर, नारायण खोकले, मच्छिंद्र धिरडेकर, यांचेसह भाविक, वारकरी, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी कैवल्य साम्राज्य ज्ञान चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज चरणी प्रार्थना करण्यात आली. भारत मातेवरील आर्थिक धार्मिक सामाजिक व मानसिक सर्व संकटे नष्ट व्हावी, भारतीय सैनिकांचे आरोग्य चांगले ठेवा, भारतीय सैनिकांचे दहा दिवसातून रक्षण करा, भारतीय सैनिकांना नेहमीच विजयश्री द्या, भारतीय सैनिकांनी सुखरूप घरी परतावे. या साठी प्रार्थना करण्यात आली.
या प्रसंगी हिमालया पेक्षा उंच साहस ज्यांचे देशासाठी सर्वोच्च बलिदान ज्यांचे अशा भारताच्या वीर जवानांना विनम्र अभिवादन करीत कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच करगीर युद्धात ज्यांनी परिश्रम पूर्वक कामगिरी केली, त्या सर्व उपस्थित जवानाचे दीर्घांयुरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. या वेळी संयोजक डॉ. नंदकिशोर एकबोटे, विठ्ठलानंद गिरी महाराज, अर्जुन मेदनकर, नायक संदीप इंदलकर, रवींद्र जोशी, राजेंद्र जाधव आदींनी मनोगते व्यक्त करीत मार्गदर्शन केले. यावेळी देशाचे सीमेवर संरक्षण करीत असलेल्या भारतीय सैनिकांचे प्रति रक्षा बंधना साठी राख्या पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. माऊली मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे वतीने विशेष सहकार्य करीत या वर्षीचे कारगीर विजय दिनाचे कीर्तनसेवा उपक्रम सोशल मीडियावर थेट प्रक्षेपण करीत सेवा उपलब्ध करून देण्यात आली. माऊलींचे मंदिरात विविध उपक्रमांनी कारगिल विजय दिन हरिनाम गजरात कीर्तन सेवेने साजरा करण्यात आला. यावेळी श्रींचे समाधीवर पुष्पवृष्टी, शहीद जवानाचे प्रतिमा पूजन, कीर्तन, श्रींचे दर्शन, प्रार्थना, प्रसाद सेवा रुजू करण्यात आलीं. येथील आवेकर भावे रामचंद्र संस्थान ट्रस्ट श्री राम मंदिर येथे कारगील युद्धात सहभागी सेवानिवृत जवानांनी श्री राम मंदिरात सद्दीच्छा भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. या प्रसंगी सर्व मान्यवरांचा श्रीफळ प्रसाद, रामरक्षास्तोत्र देऊन विश्वस्त अर्जुन मेदनकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
कारगिल विजय दिन माऊलींच्या संजीवन समाधीवर परमवीर चक्र सन्मानार्थी प्रतिमा पूजन करून भाविक, वारकरी, आजी माजी सैनिकांच्या वतीने श्रींचे समाधीवर तुळशीपत्र वाहून पुष्प वृष्टी करीत भारतीय सैन्य विजय दिवस साजरा करण्यात आला. पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणचे मंदिरांत भारतीय सैन्य विजय दिवस साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी कार्यरत आजी , माजी सैनिकांना दिर्घआयुरोग्य लाभावे यासाठी माऊलींची पूजा, दर्शन करीत साकडे घालण्यात आले. भारतीय लष्करात कार्यरत असताना वीरत्व प्राप्त झालेल्या हुतात्मा सैनिकांना यावेळी सर्व उपस्थितांनी विनम्र अभिवादन केले.
या वेळी डॉ. नंदकुमार एकबोटे म्हणाले, भारतीय सैनिकांसाठी व सर्व भारतीयांसाठी हा महत्वपूर्ण विजय दिवस असून याचा सर्व देशप्रेमी भारतीयांना त्याचा अभिमान असल्याचे सांगितले. म्हणून २६ जुलै दिवशी आपण गेली 15 वर्षे आळंदीत माऊलींच्या समाधी वर पुष्प वृष्टी करुन सैनिकांना नेहमी विजयश्री मिळावी, सैनिकांचे आरोग्य चांगले रहावे, सैनिकांचे दहा दिशातून रक्षण व्हावे अशी आर्त प्रार्थना करण्यासाठी एकत्र येत असतो असे सांगितले.
मंदिरातील ओवरीत राजेंद्र जाधव, संदीप इंदलकर, अर्जुन मेदनकर आदींनी आपल्या मनोगतातून सैनिकांवरील आपले प्रेम आपल्या प्रत्येक कृतीतून दाखवून दिले पाहिजे तसेच देशप्रेमासाठी प्रत्येकाला वेड असणे आवश्यक असल्याचे सांगितले. समाजाच्या / देशाच्या रक्षणार्थ आपले सर्वस्व समर्पित केले त्या शहीद जवानांचे फक्त १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी या दिवशीच स्मरण न करता रोजच स्मरण करणे गरजेचे असल्याचेही सांगितले. ईश्वराने दिलेल्या जीवनाचा सदुपयोग करणे हे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य असून त्यांनी ते प्रामाणिकपणे करावे असे सांगितले. तसेच कारगिल विजय दिवसाची गौरवगाथा सांगून श्रोत्यांच्या अंगावर शहारे उमटवले. नायक संदीप इंदलकर कारगिल युद्धात सहभागी आले होते. त्यानंतर मिलिटरी ड्यूटीत दोन्ही पाय त्यांना गमवावे लागले आहे. कैवल्य सामाज्य ज्ञानचक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी सैनिकांसाठी आरोग्य, दीर्घायुष्य व त्यांच्या रक्षणासाठी प्रार्थना करून शहिदांना आदरांजली वाहिली. पसायदान गायनाने कारगिल विजय दिनाचे कार्यक्रमाची सांगता झाली.
विश्व प्रार्थना पसायदान संसदेत लावण्याची मागणी :- डॉ. नंदकिशोर एकबोटे
या उपक्रमाचे माध्यमातून संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे विश्वाचे शांती, समाधान, सुख, कल्याणासाठी मागितलेले पसायदान हे संसदेच्या दोन्ही सभागृहात लावण्याची मागणी भारतीय संस्कृती संरक्षण संस्थान, पुणे कार्यवाह डॉ. नंदकिशोर शशिकला रमाकांत एकबोटे यांनी केली आहे. या साठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा आणि मागणी आहे. देशाचे माननीय राष्ट्रपती साहेब, मा. पंतप्रधान साहेब कार्यालय, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि सर्व खासदार आणि आमदार यांना निवेदन करण्यात आले आहे. तसेच संत साहित्य सर्व शालेय अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्याची मागणी डॉ. नंदकिशोर एकबोटे यांनी केली आहे. या साठी भारतातील सर्व नागरिकांनी पाठपुरावा करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
आळंदी माऊली मंदिरात भारतीय सैन्य कारगिल विजय दिवस साजरा

