Jan Bharat Samachar

९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्व संध्येला ‘क्रांतीज्योत’ यात्रा काढून

Spread the love

pune – ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्व संध्येला पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी व पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन ते हुतात्मा कर्णिक स्मारक, फरासखाना पर्यंत ‘भारत माता की जय’, ‘वंदे मात्‌रम्‌’ चा जयघोष करीत ‘क्रांतीज्योत यात्रा’ काढून शहिदांना अभिवादन करण्यात आले.

क्रांतीज्योत यात्रेचा हुतात्मा कर्णिक स्मारकास पुष्पहार अर्पण करून समारोप करण्यात आला. यावेळी समारोपीय भाषणात दीप्ती चवधरी म्हणाल्या की, ‘‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेस पक्षाचे अमूल्य योगदान आहे. महात्मा गांधी यांनी ब्रिटीश सरकारला ‘चले जाव’ चा नारा दिला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो क्रांतीकारकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्यांचे स्मरण करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे दरवर्षी ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्व संध्येला मशाल यात्रा काढण्यात येते. सध्या देशात अराजकता माजली असताना काँग्रेस पक्ष देशातील लोकशाही व संविधानाचे रक्षण करण्यासाठी अशाच पध्दतीने क्रांतीकारी लढा देत आहे.’’

यानंतर प्रशांत जगताप म्हणाले की, ‘‘देशातील समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय टिकवून ठेवण्याची महत्वाची जबाबदारी काँग्रेस पक्षावर आहे. केंद्रातील सत्तारूढ सरकार सामान्य नागरिकांच्या हक्कांची पायमल्ली करीत असताना स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारकांचे स्मरण करीत लोकशाहीच्या रक्षणासाठी दुसरा लढा उभारणे आवश्यक आहे. मशाल यात्रेच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्यात शहिद झालेल्यांचे स्मरण केले जात आहे.’’

यावेळी पुणे मनपातील काँग्रेस पक्षाचे गटनेते चंदूशेठ कदम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते गोपाळ तिवारी, सरचिटणीस सुनिल मलके, शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष कैलास गायकवाड, खजिनदार चंद्रशेखर कपोते, उपाध्यक्ष राजाभाऊ कदम, मधुकर राऊत, नगरसेवक रफिक शेख, साहिल केदारी, विशाल मलके, सुनिल शिंदे, सुमय्या नदाफ, वैशाली भालेराव, डॉ. स्नेहल पाडळे, जयाशेठ किराड, राजेंद्र भुतडा, मुनाफ शेख, नुरूद्दीन सोमजी, ॲड. रमेश पवळे, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे, सेवादलाचे लतेंद्र भिंगारे, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, इंटक अध्यक्ष चेतन आगरवाल, बाळासाहेब अमराळे, सचिन आडेकर, उस्मान तांबोळी, श्रीकृष्ण बराटे, चैतन्य पुरंदरे, सोशल मिडीया अध्यक्ष गुलाम हुसेन खान, सुरेश कांबळे, जीवन चाकणकर, युवराज मदगे, द. स. पोळेकर, निलेश बोराटे, अस्लम बागवान, हर्षद हांडे, प्रवीण करपे, अमित कांबळे, अंजली सोलापूरे, अनुसया गायकवाड, रमेश सकट, रविंद्र माझिरे, रमेश सोनकांबळे, विक्रम खन्ना, संजय मोरे, फैय्याज शेख,  गणेश जाधव, दिलीप लोळगे, अजय खुडे, राहुल वंजारी, विक्रम शहाणे, सुरेश नांगरे, किशोर मारणे, चेतन पडवळ, संतोष सुपेकर, सईद शेख, नरसिंह आंदोली आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत.  ( फोटो : सुशिल राठोड )

Exit mobile version