पुणे : श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे कोजागरी पौर्णिमेनिमित्त मंदिरात अन्नकोट साकारण्यात आला होता. यावेळी श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती आणि श्री महाकाली देवीला ५६ भोगाचा अन्नकोट दाखविण्यात आला.
कोजागरी पौर्णिमेनिमित्त मंदिरात भव्य भजन संध्या आणि महाआरतीचे देखील आयोजन करण्यात आले. ट्रस्टचे प्रमुख संस्थापक आणि विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त ॲड. प्रताप परदेशी, विश्वस्त व उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, राजेश सांकला, रमेश पटोदिया, राजकुमार चमडीया, निलेश लद्दड यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी यंदाच्या नवरात्र उत्सव आणि कोजागरी कार्यक्रमाचे आयोजन केले.
प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, विविध प्रकारच्या मिठाई, नमकीन यांसह ५६ प्रकारचे पदार्थ हा अन्नकोटामध्ये मांडण्यात आले. हा भोग तिन्ही देवींना दाखविण्यात आला. याशिवाय मंदिरात दुपारी हवन, तसेच सायंकाळी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महिला देवीभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कोजागरी पौर्णिमेनिमित्त मंदिरात आकर्षक सजावट देखील करण्यात आली. सर्व भक्तांना प्रसाद देण्यात आला व कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने दूध प्रसाद सुद्धा देण्यात आला.

