आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील पुणे आळंदी रस्त्यावरील श्री काशी विश्वेश्वर महाराज मंदिरात १९७३ पासून सुरु झालेली काकडा आरतीची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून अखंड काकडा आरती सुरु आहे. यात उत्तरोत्तर वाढ झाली असून आता युवक तरुण देखील यात सहभागी झाले आहेत. नागरिक भाविकांची पहाटे पासून काकडा आरतीला गर्दी वाढत आहे. माऊली मंदिरासह श्री ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर, श्री हजेरी मारुती मंदिरात दीपोत्सव, आरती तसेच विविध मठ, मंदिरे, धर्मशाळा परिसरात विविध गावांमध्ये ही काकडा आरतीची परंपरा जतन केली जात आहे.
या काकडा आरतीची सांगता त्रिपुरारी पौर्णिमा दिनी धार्मिक परंपरांचे पालन करण्यात आले. आळंदीतील काळेवाडी येथील श्री काशी विश्वेश्वर विठ्ठल मंदिरात कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमे पर्यंत काकड आरती चे आयोजन करण्यात आले होते. श्री काशी विश्वेश्वर मंदिरात पहाटे पाच ते सात या वेळेत धार्मिक कार्यक्रम कार्तिक स्नान, काकड आरतीची सुमधुर अभंग ,भजन ,गवळणी, गायन असे कार्यक्रम झाले आहेत. त्रिपुरारी पौर्णिमेला काकडा आरती समाप्ती काल्याचे कीर्तनाने सांगता झाली. काळेवाडी येथे काशी विश्वेश्वर मंदिरात कार्तिक स्नान निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. संगीत भजन, पहाटे काकडा आरती व महापूजा, महाप्रसाद वाटप उत्साहात झाले. कार्यक्रमाचे संयोजन बंडू उर्फ नाना काळे, समस्त काळेवाडी ग्रामस्थ यांचे वतीने करण्यात आले होते. काल्याचे किर्तन झाल्या नंतर सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. विश्वस्त प्रकाश काळे, बाबूराव काळे, शाबाजी काळे गुरुजी, सुरेश झोंबाडे, रामदास निकस, हनुमंत तापकीर, धनाजी काळे, आदींनी विशेष परिश्रम घेतले.
श्री काशी विश्वेश्वर महाराज मंदिरात काकडा आरतीचा उपक्रम परंपरेने सुरु असल्याचे बंडूनाना काळे यांनी सांगितले. यात विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. काळेवाडी मधिल नागरिकांच्या माध्यमातून हा उपक्रम अखंड सुरु आहे. यात दैनंदिन काकड आरती, भजन व महापूजा आदींचा समावेश आहे. या वर्षीची सांगता काकडा आरती महापूजा, ग्राम दिंडी प्रदक्षिणा, काल्याचे हरिकीर्तन आणि महाप्रसाद वाटपाने होणार आहे. आळंदी काळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने या काकडा आरतीचे परंपरेने आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षां पासून काळेवाडीतील श्री काशीविश्वेश्वर महाराज मंदिरात काकडा आरती उत्सवात विविध अभंग आणि किर्तन, गायनाने भल्या पहाटे पासून भक्ति मंगलमय वातावरणात काकडा आरती व प्रसाद वाटप सुरु झाले आहे. या मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार करण्यात आल्याने मंदिरही प्रशस्त झाले आहे. यामुळे मंदिरात परिसरातून भाविकांची उपस्थिती वाढली आहे. आळंदीत वारकरी संप्रदाय आणि संत परंपरेची विचारधारा काकडा आरतीने ही समाजात रुजली आहे.
तीर्थक्षेत्र आळंदीतील माऊली मंदिरासह विविध मठ, मंदिरे, धर्मशाळासह आळंदीतील पंचक्रोशीतील विविध गावांमध्ये ही काकडा आरतीची परंपरा जतन केली जात आहे. यात युवक तरुणांचा सहभाग देखील लक्षणीय आहे.
अडबंगनाथ मंदिरात काकड आरती उत्साहात
डुडुळगाव ( ता. हवेली ) येथील अडबंगनाथ मंदिरात देखील काकड आरतीचा धार्मिक कार्यक्रम हरिनाम गजरात झाला. या ठिकाणी नियमित पहाटे चार ते साडेसात पर्यंत धार्मिक कार्यक्रम, काकडा, आरती सह भजन कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम पहाटे मंगलमय वातावरणात झाले. यासाठी डुडूळगाव ग्रामस्थांसह परिसरातील भाविक भक्त यांची उपस्थिती मोठी राहिली. डुडूळगाव येथील धार्मिक पंथातील ज्येष्ठ नागरिक तसेच तरूण वर्ग, महिला व भाविक या ठिकाणी पहाटे काकड आरतीचा अनुभव घेत आहेत. माउली मंदिरात ही मंदिरातील प्रथांचे पालन करीत धार्मिक कार्यक्रमांनी काकडा उपक्रम राबविण्यात आला. येथील श्री हजेरी मारुती मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्त दीपोत्सव आणि श्रींची आरती उत्साहात झाली. माजी नगराध्यक्ष नगरसेवक राहुल चिताळकर पाटील, मिलिंद जोशी, शशिकांत घुंडरे, श्री राम मंदिर विश्वस्त अर्जुन मेदनकर यांचेसह ग्रामस्थ, श्री हजेरी मारुती भक्त, भाविक या वेळी उपस्थित होते.

