Site icon Jan Bharat Samachar

जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक खर्च ताळमेळ आढावा बैठक संपन्न

Spread the love

पुणे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक खर्च ताळमेळ आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

यावेळी निवडणूक खर्च निरीक्षक सुमित कुमार, प्रेमप्रकाश मीना, उमेश कुमार, अमित कुमार, डॉ. ए. वेंकादेश बाबू, प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी निवडणूक खर्च सोनाप्पा यमगर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्यासह निवडणूक खर्च विषयक कामकाज पाहणारे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी एकूण ३०३ उमेदवारांपैकी ३०१ उमेदवारांनी निवडणूक विषयक खर्चाची माहिती सादर केली आहे, यापूर्वी संबंधित उमेदवारांच्या खर्चाची नियमितपणे तपासणी करण्यात आली आहे. तपासणीच्यावेळी काढण्यात आलेल्या त्रुटीची उमेदवारांनी वेळोवळी पुर्तताही केलेली आहे. अद्यापही निवडणूक खर्चाबाबत माहिती सादर न केलेल्या उमेदवारांनी तात्काळ माहिती सादर करावी. निवडणूक खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांची माहिती भारत निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती  पाटील यांनी दिली.

यावेळी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्यावतीने निवडणूक खर्च विषयाच्याअनुषंगाने सूचना केल्या. त्याअनुषंगाने निवडणूक खर्च निरीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली.

Exit mobile version