Site icon Jan Bharat Samachar

रंगपंचमीच्या निमित्त मातोश्री वृद्धाश्रमामध्ये जाऊन मातृ-पितृ प्रतिष्ठानचे अध्यक्ष व नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या वतीने फुलांची रंगपंचमी साजरी करण्यात आली

Spread the love

 

दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आजी-आजोबांनी आतुरतेने वाट पाहत होते व गाण्याच्या ठेक्यावर नृत्य करीत एकमेकांच्या अंगावर फुले उधळली प्रवीण चोरबेले हे आम्हाला २० वर्षांपासून ओळखतात व आमच्या सोबत रंगपंचमी आनंद साजरा करतात आजी-आजोबा वयाचा भान विसरून लहान मुलाप्रमाणे मनसोक्त डान्स करत होते चोरबेले यांच्यामुळे रंगपंचमीचा उत्सव आनंदाने साजरा करता येतो प्रवीण हे मुलगा प्रमाणे असल्याची आजी-आजोबांनी व्यक्त केले

आनंद साजरा करताना काही आजी आजोबांनी सांगितले की अशी मजा आम्ही लहानपणी असताना केली होती ते आम्हाला प्रवीण बाळा मुळे खूप वर्षांपासून रंगपंचमीचा आनंद घेता येतो व सर्व झाल्यावर ते आम्हाला अल्पोहार त्यांच्याकडून देण्यात येतो व वर्षभरात आम्हाला जे काही वस्तू उपयोगी लागतात ते वस्तू देत आले व दरवर्षी आम्हाला बाहेर फिरायला नेतात व आमच्या अडीअडचणीच्या काळात प्रवीण आम्हाला नेहमी पाठीशी असतो असे सर्व आजी-आजोबांनी आपले मत व्यक्त केले

याप्रसंगी प्रवीण चोरबेले यांच्यासमवेत संजय चोरडिया,अनिल भन्साळी,राजेंद्र सरदेशपांडे ,रमेश देवकुळे, शैलाताई शेवाळे, कैलास परदेशी, अशोक वस्ते,पांडुरंग जगताप,हनुमंत मोरे, मनीषा खैरे, छाया चांदन,शिवा केंगारे,मयूर कोठारी,हेमंत जगताप,संजय माने,राहुल साळुंखे,सौरभ भडकुंबे,वेंकटेश भंडारी,इर्शाद अली,अमित माशाळे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

Exit mobile version