Site icon Jan Bharat Samachar

मदर टेरेसा करंडक’ महिला फुटबॉल स्पर्धा !!

Spread the love
पुणे.  सहायिनी, ऑक्सिलियम वेल्फेअर सेंटर, पुणे आणि सेल्सियन को-ऑपरेटर्स येरवडा युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बेटी सुरक्षा’ अभियाना अंर्तगत ‘मदर टेरेसा करंडक’ महिला फुटबॉल स्पर्धेत उत्कर्ष क्रीडा मंच एफसी आणि इग्नाईट एफसी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या मान्यतेखाली कोरेगाव पार्क येथील डॉन बॉस्को युथ सेंटर मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा भारतीचे अखिल भारतीय महासचिव राजजी चौधरी, पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष प्यारेलाल चौधरी, डॉन बॉस्को युवा केंद्राचे रेक्टर फादर इयान डॉल्टन, कॅटेकेटिकल सेंटरचे संचालक फादर दिनेश, डॉन बॉस्को युवा केंद्राचे प्रशासक फादर वॅलेरियन, ऑक्सिलियम वेल्फेअर सेंटरच्या सुपीरियर सिस्टर मॅग्डेलिन सिक्वेरा, सिस्टर शीला जी., एनजीओ सदनचे प्रमुख सेबास्टियन फ्रान्सिस आदि मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.

सलामीच्या सामन्यामध्ये उत्कर्ष क्रीडा मंच एफसी संघाने बिटा एफसीचा ७-१ असा पराभव केला. उत्कर्ष संघाकडून निर्वे शिंदे हिने तीन गोल तर, अनुश्री पिसाळ, मनिषा मुखिया, समिधा पाटील आणि स्नेहा बलकवडे यांनी एकेक गोल नोंदविले. दुसर्‍या सामन्यात इग्नाईट एफसी संघाने सिटी गर्ल्स गो स्पोटर्स संघाचा टायब्रेकमध्ये ५-४ असा पराभव करून विजयी सलामी दिली.

सामन्यांचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः

उत्कर्ष क्रीडा मंच एफसी बः ७ (अनुश्री पिसाळ ६ मि., निर्वे शिंदे १२, २०, २९ मि., मनिषा मुखिया १६ मि., समिधा पाटील ३४ मि., स्नेहा बलकवडे ४० मि.) वि.वि. बिटा एफसीः १ (सौम्या काळे ३६ मि.); पुर्वार्धः ६-१;

इग्नाईट एफसीः ५ (अनिशा एम. ३० मि., इशिता ३८ मि., सिया, इशिता, दिविशा; गोल चुकवलेः आईशा, सौम्य खोटे) टायब्रेकमध्ये वि.वि. सिटी गर्ल्स गो स्पोटर्सः ४ (अनिष्का ६ मि., जस्टीना सी. २५ मि., अनिष्का, जस्टीना; गोल चुकवलेः मर्लिन, तृप्ती, रिशा); पुर्ण वेळः २-२; टायब्रेकमध्येः ३-२;

Exit mobile version