Jan Bharat Samachar

शूरा आम्ही वंदितो‌’अग्निशमन केंद्रातील जवानांविषयी कृतज्ञता गुढी पाडव्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

पुणे . गुढी पाडवा अर्थात मराठी नववर्षाच्या निमित्ताने अग्निशमन दलातील जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि आगामी वर्ष सुरक्षित जावो, अशा शुभेच्छा देण्यात आल्या.
सहकार नगरमधील संजीवनी मित्र मंडळ आणि बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे एरंडवणे येथील अग्निशमन केंद्रात ‌‘शूरा आम्ही वंदितो‌’ या कार्यक्रमाचे आयोजन आज (दि. 30) करण्यात आले होते. साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियूष शहा यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीस प्रसिद्ध गायिका मंजुश्री ओक यांनी ‌‘शूरा मी वंदितो‌’ हे नाट्यगीत सादर केले. अग्निशमन केंद्रातील 25 जवानांसमवेत मंडळांचे कार्यकर्ते आणि चिमुकल्यांनी अनोख्या पद्धतीने मराठी नववर्ष साजरे केले. सुरुवातीस विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत जवानांचे औक्षण केले. प्रत्येक जवानास आकर्षक गुढी भेट देण्यात आली.


प्रास्ताविकात पियूष शहा म्हणाले, शहरात आगीची घटना घडल्यानंतर अग्निशमन केंद्रातील जवान स्वत:चा जीव धोक्यात घालून नागरिकांचा जीव वाचवितात. संपत्तीचे नुकसान होऊ नये याचीही काळजी घेतात. नागरिकांवरील संकट टाळण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणाऱ्या जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी बोलताना प्रकाश गोरे म्हणाले, पुण्याची लोकसंख्या बघता अग्निशमन केंद्र आणि कर्मचाऱ्यांची संख्या त्या मानाने खूपच कमी आहे. शहरात कुठे आग लागल्यास गणेश मंडळांचे कार्यकर्ते सर्वात आधी मदतीसाठी धावून येतात. मंडळांच्या कार्यकर्त्यांमुळे आम्हाला नागरिकांचा जीव वाचविण्यास आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यास मदत होते. एखादी दुर्घटना घडल्यास नागरिकांनीही सहकार्य करणे अपेक्षित आहे. अग्निशामक अधिकारी कमलेश चौधरी, स्टेशन ऑफिसर सुभाष जाधव, प्रकाश गोऱ्हे व फायर मॅन दिलीप घडशी, कैलास पवार, सचिन वाघोले तसेच संजीवनी मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय विद्वंस, प्रसाद दिवटे, पुष्पक शिंदे, निलेश कोंढापुरे, राकेश घोडके, सागर खोत, मनीष शेलार, साईनाथ ट्रस्टचे नरेंद्र व्यास, नंदू ओव्हाळ, गंधाली शहा, प्रमुख पाहुण्या गायिका मंजुश्री ओक , सामजिक कार्यकर्ते सचिन पवार उपस्थित होते. स्टेशन ऑफिसर राजेश जगताप यांचे विशेष सहकार्य लाभले, पियूष शाह यांनी प्रास्ताविक केले तर प्रकाश गोऱ्हे यांनी आभार

Exit mobile version