Site icon Jan Bharat Samachar

लायन शंतनु सिद्धा स्मृतीप्रित्यर्थ तिसरी ‘लायन्स् प्रौढ करंडक’ टी-२० क्रिकेट २०२५ स्पर्धा  !!

Spread the love
पुणे.  स्पोटर्सफिल्ड मॅनेजमेंट आणि पुणे लायन्स् तर्फे आयोजित लायन शंतनु सिद्धा स्मृतीप्रित्यर्थ दुसर्‍या ‘लायन्स् प्रौढ करंडक’ (४० वर्षावरील) टी-२० क्रिकेट स्पर्धेत रेवेल विनर्स आणि रिस्क्राईब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.

येवलेवाडी येथील ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत केतन पासलकर याने केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे रेवेल विनर्स संघाने सीए रॉयल्स्चा ५ गडी राखून पराभव करून आगेकूच केली. पहिल्यांदा फलंदाजी करणार्‍या सीए रॉयल्स् संघाने १४६ धावांचे लक्ष्य उभे केले. संघाचा डाव जुगल शहा (४९ धावा), अमित बलदोटा (३६ धावा) आणि कर्णधार अल्पेश गुजराथी (२० धावा) यांच्या फलंदाजीमुळे उभा राहीला. हे लक्ष्य रेवेल विनर्सने १५.४ षटकात व ५ गडी गमावून पूर्ण केले. केतन पासलकर याने ३४ चेंडूत ४ चौकार आणि तेवढेच षटकार खेचत संघाला एकहाती विजय मिळवून दिला.

अमर खेडेकर याने केलेल्या अष्टपैलु खेळीमुळे रिस्क्राईब संघाने जेडब्ल्युडी मॅजिशियन्स् संघाचा ९५ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना रिस्क्राईब संघाने १८६ धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये अमर खेडेकर याने पन्नास धावा, अमित पार्ले (३३ धावा), मिथुन किराड (३४ धावा) आणि के. वाघमारे (२३ धावा) यांनी आपल्या खेळीने संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना जेडब्ल्युडी मॅजिशियन्स्चा डाव ९१ धावांवर मर्यादित राहीला. अमर खेडेकर याने अचूक गोलंदाजी करताना २२ धावांमध्ये चार गडी टिपून संघाचा विजय साकार केला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
सीए रॉयल्स्ः २० षटकात ७ गडी बाद १४६ धावा (जुगल शहा ४९, अमित बलदोटा ३६, अल्पेश गुजराथी २०, मंगेश हांडे ३-२०) पराभूत वि. रेवेल विनर्सः १५.४ षटकात ५ गडी बाद १४७ धावा (केतन पासलकर ५५ (३४, ४ चौकार, ४ षटकार), आतिश पडवळ ३०, संजय पवार १-१९); सामनावीरः केतन पासलकर;

रिस्क्राईबः २० षटकात ५ गडी बाद १८६ धावा (अमर खेडेकर ५० (२९, ६ चौकार), अमित पार्ले ३३, मिथुन किराड ३४, के. वाघमारे २३, केतन कुवाळकर २-२५) वि.वि. जेडब्ल्युडी मॅजिशियन्स्ः १९ षटकात १० गडी बाद ९१ धावा (नितीन सामल २०, अमर खेडेकर ४-२२); सामनावीरः अमर खेडेकर;

Exit mobile version