Site icon Jan Bharat Samachar

कोद्रे फार्म्स करंडक’ खुल्या गटातील मुलांची आंतरक्लब क्रिकेट स्पर्धा !!

Spread the love

पुणे. ट्वेन्टीफोर स्पोटर्स मॅनेजमेंट तर्फे आयोजित ‘कोद्रे फार्म्स करंडक’ खुल्या गटातील मुलांच्या २५-२५ षटकांच्या आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत अभिमन्यु जाधव याने फटकावलेल्या १६३ धावांच्या जोरावर व्हि-एड्ज क्रिकेट क्लबने क्रिकस्टार रायझिंग क्रिकेट क्लबचा १२१ धावांनी सहज पराभव करून विजेतेपद मिळवले.

सिंहगड रोड येथील कोद्रे फार्म्स क्रिकेट मैदानावर झालेल्या या स्पर्धेत पहिल्यांदा फलंदाजी करताना व्हि-एड्ज क्रिकेट क्लबने ३२४ धावांचा डोंगर उभा केला. अभिमन्यु जाधव याने ६७ चेंडूत १८ चौकार व ११ षटकारांसह १६३ धावांची खेळी केली. त्याला दुसर्‍या बाजुने राहूल सोनावणे (४० धावा) आणि ऋतुराज धुलगूडे (२९ धावा) यांनी साथ दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना क्रिकस्टार रायझिंग क्लबचा डाव २०३ धावांवर मर्यादित राहीला. संघाकडून सागर कांबळे (७१ धावा), वैभव बेनबरू (४१ धावा) यांंनी प्रतिकार केला.

 

स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीडीसीएचे सभासद कैलास येवले आणि ट्वेन्टीफोर स्पोटर्स मॅनेजमेंटचे संचालक उदय म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या व्हि-एड्ज क्रिकेट क्लब आणि उपविजेत्या क्रिकस्टार रायझिंग क्लब या संघांना करंडक आणि मेडल्स् देण्यात आले.

 

अंतिम सामन्याचा निकालः

व्हि-एड्ज क्रिकेट क्लबः २५ षटकात ६ गडी बाद ३२४ धावा (अभिमन्यु जाधव १६३ (६७, १८ चौकार, ११ षटकार), राहूल सोनावणे ४०, ऋतुराज धुलगूडे २९, सचिन राठोड २-५३) वि.वि. क्रिकस्टार रायझिंग क्लबः १९ षटकात १० गडी बाद २०३ धावा (सागर कांबळे ७१ (३१, ८ चौकार, ५ षटकार), वैभव बेनबरू ४१, अभिमन्यु जाधव २-७, राहूल सोनावणे २-१०); सामनावीरः अभिमन्यु जाधव;

 

वैयक्तिक पारितोषिकेः

स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट फलंदाजः वैभव बेनबरू (३३१ धावा, ८ विकेट, क्रिकस्टार रायझिंग क्लब);

सर्वोत्कृष्ट गोलंदाजः शुभम सरोज (१५ विकेट, गायकवाड क्रिकेट अ‍ॅकॅडमी);

Exit mobile version