Site icon Jan Bharat Samachar

‘पीडीएफए लीग’ फुटबॉल स्पर्धा !!

Spread the love

पुणे. पुणे जिल्हा फुटबॉल संघटने तर्फे आयोजित ‘पीडीएफए लीग २०२५’ फुटबॉल स्पर्धेच्या व्दितीय श्रेणी गटाच्या सामन्यात केशव माधव प्रतिष्ठान इलेव्हन, डेक्कन इलेव्हन, बोपोडी एलएफए एफसी आणि सिटी एफसी पुणे या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.

कात्रज येथील भारती विद्यापीठ मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या व्दितीय श्रेणी गटाच्या झालेल्या सामन्यामध्ये ऑल्विन जोसेफ याने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर केशव माधव प्रतिष्ठान इलेव्हनने अशोका फुटबॉल क्लबचा २-१ असा पराभव केला. डेक्कन इलेव्हन ड संघाने राहुल एफसी संघाचा ४-१ असा सहज पराभव केला. सामन्यामध्ये डेकक्कन संघाच्या बलराज एस. याने दोन गोल तर, अवधुत जी. आणि संकेत पी. यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. रोहन सुनर याने १० मिनिटाला केलेल्या गोलामुळे बोपोडी एलएफए एफसी संघाने व्होबा एफसी संघाचा १-० असा पराभव केला.

सिटी एफसी पुणे संघाने पुना सोशल स्पोर्टस् क्लबचा ५-१ असा सहज पराभव केला. सिटी संघाकडून ललित पाटील याने दोन गोल केले. यांसह क्रिस निरापल्ले, राघवेंद्र शानभोगुए आणि श्लोक मोरे यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.

 

सामन्यांचा सविस्तर निकालः गटसाखळी फेरीः व्दितीय श्रेणी गटः

१) केशव माधव प्रतिष्ठान इलेव्हनः २ (अ‍ॅल्विन जोसेफ २३, ८४ मि.) वि.वि. अशोका फुटबॉल क्लबः १ (नदीम पटेल ६२ मि.); पुर्वार्धः १-०;

२) डेक्कन इलेव्हन डः ४ (बलराज एस. ४०, ४९ मि., अवधुत जी. ४५ मि., संकेत पी. ६० मि.) वि.वि. राहुल एफसीः २ (राहूल मेवानी २२ मि., कुणाल के. ५३ मि.); पुर्वार्धः २-१;

३) बोपोडी एलएफए एफसीः १ (रोहन सुनर १० मि.) वि.वि. व्होबा एफसी बः ०; पुर्वार्धः १-०;

४) सिटी एफसी पुणेः ५ (क्रिस निरापल्ले ५ मि., राघवेंद्र शानभोगुए ४७ मि., ललित पाटील ५१, ६९ मि., श्लोक मोरे ५३ मि.) वि.वि. पुना सोशल स्पोर्टस् क्लबः १ (स्वप्निल गायकवाड ३९ मि.); पुर्वार्धः १-०;

 

 

Exit mobile version