Site icon Jan Bharat Samachar

भक्तिगीतांतून शब्द आणि संगीताचा सुरेल मिलाफ

Spread the love

पुणे .आरंभी वंदीन अयोध्येचा राजा… कबीराचे विणतो शेले… कानडा राजा पंढरीचा… अशा एकाहून एक सरस रचनांसह नमो ज्ञान राजा… यासारख्या संत साहित्यातील काही नवीन स्वरबद्ध अभंग पेशवेकालीन तुळशीबाग श्रीराम मंदिरात सादर झाले. भक्तिगीतांतून शब्द आणि संगीताचा सुरेल मिलाफ यानिमित्ताने रसिकांनी अनुभवला.

 

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम मंदिरात श्रीरामनवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये ‘राम बरवा कृष्ण बरवा’ या वृषाली मावळंकर, केतन अत्रे व सहकारी यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले, विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६४ वे वर्ष साजरे होत आहे.

 

काल मी रघुनंदन पाहिले… या ग.दी. माडगूळकर यांनी लिहिलेल्या आणि सुधीर फडके उर्फ बाबुजी यांनी संगीतबद्ध केलेल्या गीताच्या सादरीकरणाला रसिकांनी विशेष दाद दिली. रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा… दशरथा घे हे पायसदान… यांसारख्या सुपरिचित भक्तीरचनांचा स्वराविष्कार देखील पुणेकरांना अनुभवता आला. श्रीराम जय राम जयजयराम च्या निनादात संपूर्ण मंदिर परिसर भक्तीमय झाला होता. स्नेहल दामले यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

 

 

Exit mobile version