Site icon Jan Bharat Samachar

टेक फोरम’,इन्स्टिटयुट ऑफ इंजिनियर्सचे व्याख्यान १२ एप्रिल रोजी 

Spread the love

पुणे .पुण्यातील उद्योग क्षेत्रातील समान विचारसरणी असलेल्या तंत्रज्ञांचा समूह असलेल्या ‘टेक फोरम’ यांच्या वतीने ‘एआय सर्वत्र : कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा दृष्टिकोन’ या विषयावर १०१ वे सदीप सादरीकरण,व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.’लाइफ पॅच एआय, पुणे’चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम मोरे यांचे हे व्याख्यान शनिवार,दि. १२ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता, फिरोदिया सभागृह, इन्स्टिटयुट ऑफ इंजिनिअर्स(शिवाजीनगर, पुणे )येथे होणार आहे.हा कार्यक्रम इन्स्टिटयुट ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), पुणे लोकल सेंटर आणि ‘टेक फोरम’ यांचा संयुक्त उपक्रम आहे.हे व्याख्यान विनामूल्य आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत विलास रबडे, हेमंत पाध्ये, डॉ. उत्तम आवारी, अनिल चैतन्य, गौतम मोरे यांनी आज ही माहिती दिली.

‘टेक फोरम’चा प्रमुख उपक्रम असलेल्या ‘इव्ही टेक्नॉलॉजी डे’चे सादरीकरण हेमंत पाध्ये करतील, तर सुरेंद्र अग्रवाल मेडिकल डिव्हायसेस ग्रुप विषयी माहिती देतील.याच कार्यक्रमात टेक फोरमच्या अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटनदेखील करण्यात येणार आहे.इन्स्टिटयुट ऑफ इंजिनिअर्स ,पुणे लोकल सेंटर यांच्या सहकार्याने ‘टेक फोरम’ दर महिन्याला दोन तांत्रिक व्याख्याने,सादरीकरणे ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष स्वरूपात आयोजित करत असतो.

टेक फोरमची स्थापना २९ जून २०२१ रोजी झाली. समान विचारांच्या व्यक्ती आणि समविचारी संस्थानी यंत्रज्ञान क्षेत्रात एकत्र काम करण्याचा उद्देशाने संस्थेची सुरुवात झाली.नाविन्यपूर्ण संशोधने, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा अनुभव आणि उद्योजकांचे ज्ञान, या सगळ्यांचे योगदान या माध्यमातून विना मोबदला दिले जाते. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आय आय एस ई आर ) चे संचालक डॉ .सुनील भागवत यांना कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.

शंभर ऑनलाइन टेक टॉक्स,बारा ऑफलाइन टेक टॉक्स,सहा कार्यशाळा ,तीन वर्षे नियमितपणे ईव्ही टेक्नॉलॉजी वर परिसंवाद फोरमने केले असून जागतिक दूरचित्रवाणी दिन ,जागतिक रेडिओ दिवस , जागतिक दूरसंचार,हॅम रेडिओ दिवस आणि सर जे. सी. बोस वर्धापन दिन यासह विविध वार्षिक कार्यक्रम केले जातात,अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Exit mobile version