Site icon Jan Bharat Samachar

पीडीएफए लीग’ फुटबॉल स्पर्धा !!

Spread the love
पुणे . पुणे जिल्हा फुटबॉल संघटने तर्फे आयोजित ‘पीडीएफए लीग २०२५’ फुटबॉल स्पर्धेच्या व्दितीय श्रेणी गटाच्या सामन्यात दुर्गा स्पोटर्स अ‍ॅकॅडमी, भारती एफसी, ईगल एफसी, साई फुटबॉल अ‍ॅकॅडमी आणि खडकी ब्ल्युज् स्पोटर्स असोसिएशन या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.

कात्रज येथील भारती विद्यापीठ मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या व्दितीय श्रेणी गटाच्या झालेल्या सामन्यामध्ये दुर्गा स्पोटर्स अ‍ॅकॅडमी संघाने डेक्कन इलेव्हन ड संघाचा ६-० असा धुव्वा उडविला. दुर्गा संघाकडून एल्विन फ्रान्सिस याने दोन गोल केले. नेल्सन पास्ते, मयुर वाघिरे, मनिश बिसोई आणि सिद्धांथ वर्धा यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. भारती एफसी संघाने व्होबा एफसी ब संघाचा ६-० असा सहज पराभव केला. भारती संघाकडून संकल्प छेत्री आणि हुपर नोनगफोड यांनी प्रत्येकी दोन गोल केले. यासह फुर भुतिया आणि बंकिमचंद्र त्रिपुरा यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. नेलो कोमुत आणि देबू चकमा यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर ईगल एफसी संघाने सिटी एफसी पुणे संघाचा २-१ असा पराभव केला.

शुभम गिरी आणि विवेक मुरकूटे यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर साई फुटबॉल अ‍ॅकॅडमी संघाने अशोका एफसीचा २-० असा पराभव केला. अथर्व कौसाळकर याने केलेल्या दोन गोलांच्या मदतीने खडकी ब्ल्युज् स्पोटर्स असोसिएशनने सनी डेज् संघाचा २-० असा पराभव केला.

सामन्यांचा सविस्तर निकालः गटसाखळी फेरीः व्दितीय श्रेणी गटः
१) दुर्गा स्पोटर्स अ‍ॅकॅडमीः ६ (नेल्सन पास्ते १७ मि., मयुर वाघिरे २८ मि., एल्विन फ्रान्सिस ३१, ४९ मि., मनिश बिसोई ६० मि., सिद्धांथ वर्धा ६१ मि.) वि.वि. डेक्कन इलेव्हन डः ०; पुर्वार्धः ३-०;
२) भारती एफसीः ६ (संकल्प छेत्री १०, ४१ मि., फुर भुतिया ३२ मि., बंकिमचंद्र त्रिपुरा ३७ मि., हुपर नोनगफोड ४६, ६२ मि.) वि.वि. व्होबा एफसी बः ०; पुर्वार्धः २-०;
३) ईगल एफसीः २ (नेलो कोमुत १५ मि., देबू चकमा १९ मि.) वि.वि. सिटी एफसी पुणेः १ (श्लोक मोरे १६ मि.); पुर्वार्धः २-१;
४) साई फुटबॉल अ‍ॅकॅडमीः २ (शुभम गिरी २ मि., विवेक मुरकूटे ६७ मि.) वि.वि. अशोका एफसीः ०; पुर्वार्धः १-०;
५) खडकी ब्ल्युज् स्पोटर्स असोसिएशनः २ (अथर्व कौसाळकर ११ मि. पेनल्टी, २१ मि., पेनल्टी) वि.वि. सनी डेज्ः ०; पुर्वार्धः २-०;

Exit mobile version