Site icon Jan Bharat Samachar

‘एमआयडीसी’च्यावतीने इंदापूर व दौंड तालुक्यात वारस नोंदी शिबीराचे आयोजन

Spread the love

बारामती. राज्य शासनाच्या १०० दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) बारामती प्रादेशिक कार्यालयाच्यावतीने भुखंड क्र. सी-३९, टु ब्रदर्स कंपनीच्या समोर, सी ब्लॉक, एमआयडीसी, इंदापूर येथे १५ एप्रिल तर सीएफसी हॉल, एमआयडीसी उपविभाग, कुरकुंभ, दौंड येथे १६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता वारस नोंदी शिबाराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबीरात इंदापूर आणि दौंड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या, भुखंडधारकांच्या समस्या सोडविण्यात येणार आहेत. तरी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक व भूखंडधारकांनी उपस्थित राहून वारस नोंदी करुन घ्याव्यात, असे आवाहन प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी केले आहे.

Exit mobile version