आळंदी ( अर्जुन मेदनकर ) – पुणे जिल्हा परिषदेतील सहाय्यक प्रशासन अधिकारी (कक्ष अधिकारी) बाळकृष्ण बबन मंडले यांनी ३८ वर्षांचा यशस्वी सेवाकाळ पूर्ण करून ३१ मार्च २०२५ रोजी सेवानिवृत्ती स्वीकारली. १९८६ मध्ये परिचर (वर्ग ४) म्हणून पुणे जिल्हा परिषदेत रुजू झालेल्या मंडले यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि प्रामाणिकपणाने सहाय्यक प्रशासन अधिकारीपदापर्यंत मजल मारली. त्यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्याचे नुकतेच आळंदी येथे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये सहकारी आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
मंडले यांनी आपल्या कारकीर्दीत पंचायत समिती इंदापूर, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पशूसंवर्धन विभाग आणि ग्रामिण पाणीपुरवठा 
सेवानिवृत्ती सोहळ्यात मंडले यांच्या दीर्घ सेवेचा आणि त्यांच्या कार्यशैलीचा गौरव करण्यात आला. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी जपलेला सौहार्द आणि कार्यक्षमता यामुळे ते सर्वांचे आवडते सहकारी ठरले. सोहळ्याला आळंदी शहर शिवसेनाप्रमुख राहुल चव्हाण, ज्ञानेश्वर रायकर, विष्णू तापकीर, सचिन गिलबिले, दिनेश घुले, ज्ञानेश्वर घुंडरे, रोहिदास कदम, नितीन ननवरे, अर्जुन मेदनकर, महादेव पाखरे, मोहन तळेकर, शशिकांत बाबर, हिरामण तळेकर, अनिल जोगदंड, सुरेश कदम, सागर म्हसुडगे, मुकेश दंडवते, नितीन आल्हाट, शारदा खोमणे, बापूराव शिरतोडे, ज्ञानेश्वर चव्हाण, डॉ.सौरभ पाटील, डॉ. चंद्रशेखर सोनवणे, हनुमंत चव्हाण, डॉ.श्रीकांत महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी मंडले यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मंडले यांनी आपल्या सेवाकाळात अनेक आव्हानांना सामोरे जात प्रशासकीय कामकाजात आपली छाप पाडली. त्यांचा साधा स्वभाव, सहकार्याची वृत्ती आणि कामाप्रती निष्ठा यामुळे ते सहकाऱ्यांमध्ये आदराचे स्थान मिळवू शकले. सेवानिवृत्तीनंतरही समाजसेवेच्या माध्यमातून त्यांना सामाजिक कार्यात सक्रिय राहायचे आहे. “लोकांच्या समस्या सोडवणे आणि समाजासाठी काहीतरी चांगले करणे हा माझा उद्देश आहे,” असे त्यांनी सांगितले. हा सोहळा मंडले यांच्या दीर्घ आणि प्रामाणिक सेवेचा सन्मान करणारा ठरला.