Site icon Jan Bharat Samachar

संविधान ग्रुप’ ने मानले पुणे पोलिसांचे आभार

Spread the love

पुणे .भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत आणि सुनियोजित प्रयत्नांनी पार पाडल्याबद्ल ‘संविधान ग्रुप’ ने पुणे पोलिसांचे आभार मानले आहेत. ‘संविधान ग्रुप’ चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन गजरमल,संस्थापक राकेश सोनवणे आणि सामाजिक कार्यकर्ते नीलेश निकम उपस्थित होते.पुण्यातील सर्व उपक्रमांसाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार,उपायुक्त स्मार्तना पाटील,सहाय्यक पोलिस आयुक्त दीपक निकम असे सर्व अधिकारी,बंडगार्डन पोलीस स्टेशनचे प्रभारी रवींद्र गायकवाड,गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.राऊत,सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम,पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार,पोलीस उप निरीक्षक मोहन काळे, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर बडे,मनोज भोकरे,प्रदीप शिनोले,प्रकाश आव्हाड,लखन बांगर,निलेश जाधव,मोहन जाधव,संजय रसाळ,प्रसाद पवार,डांगी ,गावडे यांनी बंदोबस्त ठेवला,वाहतुकीचे सुरळीत नियोजन केल्याबद्दल सर्व पोलिसांचे आभार मानण्यात आले.

पोलीसांनी भीमजयंती उपक्रमातील प्रत्येक कार्यकर्ता व प्रत्येक संस्था,मंडळाला शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक व कार्यक्रम व्यवस्थित व्हावा या संदर्भात मार्गदर्शन केले.चर्चा विनिमय करून त्यांचे प्रश्न सोडवून जयंती उत्साहात आणि शांततेत साजरी होईल असे नियोजन केल्यासंदर्भात ‘संविधान ग्रुप’ ने आभार व्यक्त केले .

 

Exit mobile version