Site icon Jan Bharat Samachar

‘लिंग समतेबाबत कायदेशीर दृष्टिकोन’ विषयावर प्रशिक्षण 

Spread the love

पुणे . भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज(एरंडवणे,पुणे) आणि भारती विद्यापीठाच्या महिला सक्षमीकरण कक्षाच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतामधील लिंग समतेबाबत कायदेशीर दृष्टिकोन’ या विषयावर १५ दिवसांचा प्रशिक्षण अभ्यासवर्ग यशस्वीरित्या पार पडला. हा अभ्यासवर्ग दि.३१ मार्च ते दि.१४ एप्रिल २०२५ या कालावधीत ऑनलाईन स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. एल.एल.एम. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमाचा उद्देश लिंग न्याय(जेंडर जस्टीस), राज्यघटनेतील तरतुदी, कार्यस्थळावरील अधिकार आणि समकालीन लिंगसंबंधित कायदेशीर मुद्द्यांबाबत सखोल माहिती देणे हा होता.

या अभ्यासक्रमाचे आयोजन न्यू लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉ.उज्वला बेंडाळे, उपप्राचार्य डॉ.ज्योती धर्म,समन्वयक डॉ.विद्या ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.डॉ.रोहित सुरवसे,शुभम त्रिपाठी,मयुरा पवार यांनी संयोजन केले.अभ्यासक्रमाची रचना आकांक्षा घाटोळ यांनी केली.या अभ्यासक्रमात दिव्या सक्सेना,डॉ.शैला डावरे,डॉ.मयुरा साबणे, हर्षद पुजारी,डॉ.नाझिया पठाण,डॉ.शशीकांत हजारे, डॉ.अनन्या बिबवे आणि डॉ.अभिलाषा हजारे या मान्यवर तज्ज्ञांनी व्याख्याने दिली.

Exit mobile version