Site icon Jan Bharat Samachar

‘महाराष्ट्र राज्य आंतर-जिल्हा अजिंक्यपद’ फुटबॉल स्पर्धा !!

Spread the love

पुणे. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (डब्ल्युआयएफए) यांच्यावतीने आयोजित ‘महाराष्ट्र राज्य आंतर-जिल्हा अजिंक्यपद’ फुटबॉल २० वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत पुणे जिल्हा संघाने आव्हान उपांत्यपुर्व फेरीत संपुष्टात आले. रायगड संघाने पुणे संघाचा १-० असा पराभव केला.

सिंहगड इन्स्टिट्युट कॉलेज कँपस, लोणावळा येथे सुरू असलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत पुणे आणि रायगड संघामधील उपांत्यपुर्व फेरीमध्ये रायगड संघाने सरस खेळ करून १-० असा विजय मिळवला. साखळी फेरीमध्ये पुणे संघाने सलामीच्या सामन्यामध्ये वाशिम संघाचा १९-० असा सहज पराभव केला होता. त्यानंतर दुसर्‍या सामन्यामध्ये ठाणे संघाचा १-० असा पराभव करून उपांत्यपुर्व फेरी गाठली होती.

 

या सामन्यामध्येसुद्धा पुणे आणि रायगड संघाने जोरदार खेळ केला. पुर्वार्धापर्यंत दोन्ही संघातील खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघाच्या गोलकक्षापर्यंत मुसंडी मारली होती परंतु गोलशुन्य बरोबरीची कोंडी काही फुटली नव्हती. उत्तरार्धात पुणे संघाच्या गोलकक्षात चुकीच्या पद्धतीने रायगड खेळाडूला अडविल्याबद्दल पेनल्टी देण्यात आली आणि ६९ व्या मिनिटाला रायगड संघाला पेनल्टी मिळाली. या पेनल्टीचा योग्य फायदा घेत क्षितीज के. याने गोल करून रायगड संघाला १-० असा विजय मिळवून दिला.

 

सामन्यांचा सविस्तर निकालः उपांत्यपुर्व फेरीः

रायगड जिल्हाः १ (क्षितीज के. ६९ मि. पेनल्टी) वि.वि. पुणे जिल्हाः ०;

 

 

Exit mobile version