Site icon Jan Bharat Samachar

‘घर मनातलं’ सांगितिक अभिवाचनाला चांगला प्रतिसाद !

Spread the love

पुणे .आयुष्यभर ध्यास घेतलेल्या घरासाठी मराठी साहित्य आणि काव्यातून उतरलेल्या तरल संवेदना प्रस्तुत करणारा,’वृंदावन’ प्रस्तुत ‘घर मनातलं’ हा सांगीतिक अभिवाचनाचा अनोखा कार्यक्रम शनिवारी चांगलाच रंगला.दि.१९एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवन(सेनापती बापट रस्ता) येथे येथे हा कार्यक्रम झाला.

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनने या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत केले होते. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २४० वा कार्यक्रम होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले .’घर’ या संकल्पनेवरील लोकप्रिय मराठी भावगीते आणि गाणी,मराठी साहित्यातील उतारे हेही या कार्यक्रमाचे एक वैशिष्टय होते.प्रवेश विनामूल्य होता.विवेक वेलणकर,प्र.ना.परांजपे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन ज्येष्ठ मराठी कॉपीरायटर राजेंद्र देशपांडे यांची होती. संहितेसाठी संशोधन,संपादन व लेखन डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी केले .ज्येष्ठ अभिनेत्री अनुराधा जोशी,डॉ.वंदना बोकील कुलकर्णी,प्रदीप फाटक आणि युवा अभिनेता आदित्य बीडकर या कलाकार,वाचक, निवेदकांसोबत संगीत संयोजक योगेश तपस्वी,गायिका बिल्वा द्रवीड

या कार्यक्रमात सहभागी झाले.सिंथेसायझरवर अमृता ठाकुरदेसाई, तबला आणि ऑक्टोपॅडवर पद्माकर गुजर आणि तालवाद्यांसह अशोक सासणे या कलाकारानी संगीतसाथ केली.नेपथ्य,प्रकाश योजना सुरेंद्र गोखले यांची होती.कला दिग्दर्शन शैलेश ढेरे यांचे होते.वृंदावन प्रस्तुत ‘घर मनातलं’या कार्यक्रमाची निर्मिती सौ.ऋजुता राजेंद्र देशपांडे यांची होती .चंद्रशेखर भागवत हे कार्यकारी निर्माते आहेत.

 

Exit mobile version