Jan Bharat Samachar

आळंदी ग्रामस्थांची सप्ताह सोहळ्यात अन्नदान महाप्रसाद सेवा 

Spread the love

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) . श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त आळंदी ग्रामस्थ आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानकमेटी आयोजित ३ ते १० मे २०२५ या कालावधीतील अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात आळंदी ग्रामस्थांचे वतीने सप्ताहाचे प्रारंभीची ( दि. ३ ) आणि काल्याचे कीर्तन दिनी ( दि. १० ) अशा दोन दिवसांची अन्नदान महाप्रसाद सेवा देण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक ग्रामस्थ, नागरिक यांचे वतीने सेवेसाठी रोख स्वरूपात देणगी आणि किराणा माल साहित्याचे स्वरूपात वस्तू स्विकारल्या जाणार आहेत. आळंदी नगरपरिषद माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील यांचे मार्गदर्शनात झालेल्या आळंदी ग्रामस्थांचे बैठकीत या बाबतचा निर्णय घेण्यात आला. यावेळी ग्रामस्थांना करण्यात आलेल्या आवाहनास उपस्थितांनी मोठा प्रतिसाद देत मदत देण्यास सुरुवात देखील केली.

बैठकीत तात्काळ ग्रामस्थांचे आवाहन स्वीकारत श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरात सेवारत उपव्यवस्थापक तुकाराम माने यांनी आपल्या सेवेस २५ वर्ष झाल्या बद्दल श्रींचे सप्ताहातील आळंदी ग्रामस्थ यांचे माध्यमातून होत असलेल्या अन्नदान महाप्रसाद वाटपाचे सेवेसाठी ५१ हजार रुपयांची देणगी रोख स्वरूपात दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील यांनी कृष्णाजी चिताळकर पाटील यांचे नावे ११ हजार रुपये, माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले ११ हजार रुपये, नंदकुमार कुऱ्हाडे पाटील ११ हजार रुपये, सोमनाथ डवरी २ हजार ५०० रुपयांची रोख देणगी जाहीर करून रोख स्वरूपात देणगी स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आली. तसेच या सोहळ्यातील अन्नदानासाठी किराणामाल आदी साहित्य यात माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील यांनी २५ कट्टे साखर, माजी उपाध्यक्ष विलास घुंडरे परील यांनी २ पोती तांदूळ, नंदकुमार कुऱ्हाडे पाटील यांनी ५ पोती गहू, माजी नगरसेवक विष्णू वाघमारे यांनी २ पोतीगहू, २१ किलो हरबरा डाळ, मज नगरसेवक डी.डी. भोसले पाटील यांनी ५० किलो डाळ, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी १५ हजार पत्रावळी आणि निलेश महाराज लोंढे यांनी संपूर्ण भाजीपाला देण्याची जबाबदारी या बैठकीत स्वीकारली.जास्तीत जास्त ग्रामस्थांनी या अन्नदान सेवेत सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन निलेश महाराज लोंढे यांनी केले आहे.

या बैठकीत सोहळ्यात सर्व ग्रामस्थानी सहभागी होण्याचे तसेच सढळ हाताने सहकार्य करण्याचे ठरले. सोहळ्यातील परायणास जास्त जास्त नागरिक, ग्रामस्थानी बसण्यासाठी आवाहन करण्यात आले. यावेळी सोहळ्याचे यशस्वीतेसाठी ग्रामस्थांच्या विविध सेवा समिती मधील सदस्य यांची नावे घेऊन समित्या गठीत करण्यात आल्या. नागरिक, ग्रामस्थ यांनी अधिक चांगला सोहळा कसा होईल यासाठी सूचना कराव्यात असे आवाहन माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे यांनी आवाहन केले. या बैठकीस ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवर ग्रामस्थ पदाधिकारी यांनी सुसंवाद साधून बैठक शांततेत पार पडली. यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे मुख्य व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांचेसह विविध मान्यवर पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. आळंदी देवस्थान नियंत्रित भक्त निवासात वस्तू स्वरूपातील साहित्य जमा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Exit mobile version