Site icon Jan Bharat Samachar

कवी  ज्ञानेश्वर शांताबाई नारायण शिळवणे यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथातील ९०३४ ओव्यांचा अर्थ काव्यरूपात  गुंफून १२८४ कवितांचा समावेश असलेल्या ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचे 27 एप्रिल 2025 रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते चाकण येथे    प्रकाशन

Spread the love

पुणे . युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा (चाकण) आणि जय भोले अमरनाथ सेवा संघ वाघजाईमाता देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने कवी  ज्ञानेश्वर शांताबाई नारायण शिळवणे यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथातील ९०३४ ओव्यांचा अर्थ काव्यरूपात  गुंफून १२८४ कवितांचा समावेश असलेल्या ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचे  प्रकाशन दि. २७ एप्रिल 2025 रोजी  सायंकाळी 6:30 वाजता वाघजाईनगर (खराबवाडी) चाकण येथे करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ह भ प मारुती बाबा कुऱ्हेकर  महाराज, ह भ प शंकर महाराज शेवाळे, भोसरीचे आमदार महेश लांडगे, खेळ आळंदीचे आमदार बाबाजी काळे, खेळ आळंदीचे माजी आमदार दिलीप काळे, मावळचे आमदार सुनील शेळके, विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे, जुन्नर चे आमदार शरद सोनवणे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे आदी विविध मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
.       युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा (चाकण) आणि जय भोले अमरनाथ सेवा संघ वाघजाईमाता देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने  २६ ते २९ एप्रिल दरम्यान संत ज्ञानेश्वर माऊली जीवनचरित्र कथायज्ञाचे आयोजन करण्यात आले असून हा सोहळा वाघजाईनगर (खराबवाडी) चाकण येथे सायं. ६ ते ९ या  वेळेत संपन्न होणार असल्याचे आयोजकांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. या सोहळ्यात कथाकार सद्‌गुरु ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे यांचा ज्ञानेश्वर भक्ती कथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
. या वेळी  संगीतकार निहार शेंबेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि स्वतः गायलेल्या पसायदानाच्या अर्थावरील सुरेल गीता चे ही प्रसारण करण्यात येणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद चाकणचे अध्यक्ष व ज्ञानेश्वरी काव्यर्थ ग्रंथाचे लेखक  ज्ञानेश्वर शिळवणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख रामदास धनवटे, महाराष्ट्र साहित्य परिषद चाकणचे  कार्याध्यक्ष  मधुकर गिलबिले, महाराष्ट्र साहित्य परिषद चाकणचे उपाध्यक्ष ऍड. प्रीतम शिंदे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह  डॉ.विजय गोकुळे  महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सहकार्यवाह डॉ. निलेश झगडे आदी संयोजकांनी केले आहे

Exit mobile version