Site icon Jan Bharat Samachar

‘महाराष्ट्र राज्य आंतर-जिल्हा अजिंक्यपद’ फुटबॉल स्पर्धा !!

Spread the love
पुणे. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (डब्ल्युआयएफए) यांच्यावतीने आयोजित ‘महाराष्ट्र राज्य आंतर-जिल्हा अजिंक्यपद’ फुटबॉल वरिष्ठ गटाच्या मुलांच्या स्पर्धेत पुणे जिल्हा संघाने रायगड संघाचा २-१ असा पराभव करून विजयी सलामी दिली.

नागपुर येथे झालेल्या आंतर-जिल्हा स्पर्धेत पुण्यासह रायगड, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापुर, अमरावती, नागपूर आणि चंद्रपुर हे संघ सहभागी झाले आहेत. पुणे संघाने सामन्याची सुरूवातच धडाक्यामध्ये केली. तिसर्‍या मिनिटाला गुलाम अन्सारी याने दिलेल्या पासवर सुमित भंडारी याने गोल करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पुणे संघाने रायगड संघावर गोल करून दबाव निर्माण केला. रायगड संघ दबावाखाली असताना पुणे संघाने आपले आक्रमण कायम ठेवले होते. २३ व्या मिनिटाला सुमित भंडारी याने दिलेल्या पासवर यश साळुंखे याने अजून एक गोल करून पुण्याला २-० अशी आघाडी मिळवून दिली.
उत्तरार्धात रायगड संघाने ५१ व्या मिनिटाला गोल करून आघाडी १-२ अशी कमी केली. पुणे संघाला उत्तरार्धात गोल करण्याच्या संधी मिळाल्या परंतु त्यामध्ये यश त्यांना मिळाले नाही. पुणे संघाने सामना २-१ असा जिंकून विजयी सुरूवात केली.

सामन्यांचा सविस्तर निकालः
पुणे जिल्हाः २ (सुमित भंडारी ३ मि., यश साळुंखे २३ मि.) वि.वि. रायगड जिल्हाः १ (सौरभ के. ५१ मि.);

Exit mobile version