Site icon Jan Bharat Samachar

महाराष्ट्र राज्य आंतर-जिल्हा अजिंक्यपद’ फुटबॉल स्पर्धा !!

Spread the love
पुणे . वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (डब्ल्युआयएफए) यांच्यावतीने आयोजित ‘महाराष्ट्र राज्य आंतर-जिल्हा अजिंक्यपद’ फुटबॉल वरिष्ठ गटाच्या मुलांच्या स्पर्धेत पुणे जिल्हा संघाला मुंबई संघाकडून ०-२ असा पराभवाचा सामना करावा लागला.

नागपुर येथे झालेल्या सुरू असलेल्या या आंतर-जिल्हा स्पर्धेत मुंबई संघाने सहज विजय मिळवला. पुण्यापेक्षा वरचढ खेळ केलेल्या मुंबई संघाने पुर्वार्धातच दोन गोल करून सामन्यावरील आपले वर्चस्व सिद्ध केले होते. अराफात अन्सारी याने ३३ व्या मिनिटाला गोल करून मुंबई संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पाचच मिनिटांनी अन्सारी याने आणखी एक गोल चढवून ही आघाडी २-० अशी वाढवली. पुण्याच्या खेळाडूंनी पिछाडीनंतर जोरदार खेळ केला. परंतु यशस्वी गोलामध्ये रूपांतर करून आघाडी कमी करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. उत्तरार्धात दोन्ही संघांंनी यशस्वी चाली रचल्या पण, गोलांमध्ये रूपांतर करण्यास दोन्ही संघ अपयशी ठरले.

पुणे संघाचा स्पर्धेतील हा पहिलाच पराभव ठरला. याआधी पुणे संघाने सलामीच्या सामन्यामध्ये रायगड संघावर २-१ अशी तर, दुसर्‍या सामन्यामध्ये औरंगाबाद संघाचा १-० असा पराभव केला होता.

Exit mobile version