Site icon Jan Bharat Samachar

चांदणी चौकातील आपघातातील जखमींसाठी चंद्रकांतदादा सरसावले

Spread the love

पुणे. कोथरुड मधील भुसारी कॉलनी जवळ पीएमपीच्या बसचे ब्रेक फेल होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात तीन जण जखमी झाले असून; यांच्यावर उपचारासाठी कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील सरसावले आहेत. जखमींना सह्याद्री रुग्णालयात दाखल करुन त्यांचा उपचाराचा सर्व खर्च उचलून सामाजिक बांधिलकी जपली.

अधिक माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी कोथरुड डेपोकडे येणाऱ्या बसचे ब्रेक फेल झाल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात चार ते पाच वाहनांचे नुकसान झाले, तर तीन जण जखमी झाले. या जखमींना जवळच्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांना समजताच; त्यांनी जखमींवर चांगले उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, सर्व उपचाराचा खर्च उचलून कुटुंबियांना धीर दिला. ना. पाटील यांच्या संवेदनशीलतेचे कोथरुड मधील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Exit mobile version