Site icon Jan Bharat Samachar

‘एसए अजिंक्यपद करंडक’ १४ वर्षाखालील आंतरक्लब टी-२० क्रिकेट २०२५ स्पर्धा

Spread the love

पुणे. एसए स्पोटर्स मॅनेजमेंट तर्फे आयोजित ‘एसए अजिंक्यपद करंडक’ १४ वर्षाखालील आंतरक्लब टी-२० क्रिकेट २०२५ स्पर्धेत एएसआर स्पोटर्स, अजित वाल्हेकर अ‍ॅकॅडमी, सिल्व्हर क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि एसएआरके क्रिकेट अ‍ॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.

सिंहगड रोड येथील व्हिजन क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत अन्वित डोमकावळे याने फटकावलेल्या ६६ धावांच्या जोरावर एएसआर स्पोटर्स संघाने प्रशांत क्रिकेट झोन संघाचा १० गडी राखून सहज पराभव केला. अन्वित याने २७ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ६६ धावांची खेळी केली. तर, आयुश पवार याने नाबाद २२ धावांची खेळी करून पहिल्या गड्यासाठी ९१ धावांची अभेद्य भागिदारी करून संघाला सहज विजय मिळवून दिला. यश दराडे याने केलेल्या अचूक गोलंदाजीमुळे अजित वाल्हेकर अ‍ॅकॅडमीने छत्रपती अ‍ॅकॅडमीचा ९ गडी राखून पराभव केला. यश याने १९ धावांमध्ये ४ गडी बाद करून चमकदार गोलंदाजी केली.

आरव अंबुलगेकर याने फटकावलेल्या ५५ धावांच्या खेळीमुळे सिल्व्हर क्रिकेट अ‍ॅकॅडमीने पुणे क्रिकेट क्लबचा ९ धावांनी पराभव केला. आरव आणि दिनेश पवार (नाबाद २९ धावा) यांनी सिल्व्हर क्रिकेट अ‍ॅकॅडमीला १३१ धावांचे लक्ष्य उभे करून दिले. उत्तरादाखल पुणे क्रिकेट क्लबचा डाव १२२ धावांवर मर्यादित राहीला. पुष्कराज गावडे याने केलेल्या चमकदार गोलंदाजीमुळे एसएआरके क्रिकेट अ‍ॅकॅडमीने कोद्रे फार्म्स अ‍ॅकॅडमीचा ७८ धावांनी सहज पराभव केला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
प्रशांत क्रिकेट झोनः २० षटकात ८ गडी बाद ९० धावा (प्रथमेश येलवंते ४०, शिवराज कर्पे १५, आरूष आत्रे २-१६) पराभूत वि. एएसआर स्पोटर्सः ९.३ षटकात बिनबाद ९१ धावा (अन्वित डोमकावळे नाबाद ६६ (२७, ६ चौकार, ५ षटकार), आयुश पवार नाबाद २२); सामनावीरः अन्वित डोमकावळे;

छत्रपती अ‍ॅकॅडमीः १९.२ षटकात १० गडी बाद ९० धावा (अर्ध्य सपकाळ १६, अंकिता गायकवाड १५, यश दराडे ४-१९, पृथ्वीराज कोंडे २-५) पराभूत वि. अजित वाल्हेकर अ‍ॅकॅडमीः ११.३ षटकात १ गडी बाद ९४ धावा (पृथ्वीराज कोंडे ५४ (३९, ९ चौकार), अभीर चोर नाबाद १९); सामनावीरः यश दराडे;

सिल्व्हर क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ५ गडी बाद १३१ धावा (आरव अंबुलगेकर ५५ (४४, ६ चौकार, २ षटकार), दिनेश पवार नाबाद २९, वैंकटेश ताडवलकर ४-१०) वि.वि. पुणे क्रिकेट क्लबः २० षटकात ७ गडी बाद १२२ धावा (दर्शन हिरकुर ४२, हर्ष पाश्ते ३१, रोहन चव्हाण ३-१४, दिनेश पवार २-१४, आरव अंबुलगेकर २-२८); सामनावीरः आरव अंबुलगेकर;

एसएआरके क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ५ गडी बाद १४३ धावा (शर्विल एस. ४३, क्षितीज पिंगळे २३, विराज तुपे २२, रोनित चौहान १-१६) वि.वि. कोद्रे फार्म्स अ‍ॅकॅडमीः १७.४ षटकात १० गडी बाद ६५ धावा (विदीत रायकर १८, पुष्कराज गावडे ४-२०, सृष्टी भुजबळ ३-१०, माही सुंकाळे २-३); सामनावीरः पुष्कराज गावडे.

Exit mobile version