Site icon Jan Bharat Samachar

‘युथ करंडक’ १२ वर्षाखालील मुलांची आंतरक्लब क्रिकेट स्पर्धा

Spread the love
पुणे, निकीत मलके स्पोटर्स मॅनेजमेंट आणि पुणे क्रिकेट क्लब यांच्यावतीने ‘युथ करंडक’ १२ वर्षाखालील मुलांच्या आंतरक्लब (३०-३० षटकांच्या) क्रिकेट स्पर्धेत पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि लीडिंग स्ट्रॉक क्रिकेट अ‍ॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.

वाघोली येथील पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत अथर्व कावळे याने केलेल्या ५९ धावांच्या जोरावर पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमी अ संघाने क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाचा १४१ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमीने ३० षटकात २३१ धावांचे लक्ष्य उभे केले. अथर्व कावळे याने ५९ धावांची खेळी केली. अमरेंद्र सिंग (४५ धावा), राजवीर राऊत (३५ धावा) आणि सार्थक पाटील (३१ धावा) यांनी धावांचे योगदान देत संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. या लक्ष्याचा पाठलाग करताना क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाचा डाव ९० धावांवर गडगडला.

अथर्व सिन्हा याने केलेल्या अष्टपैलु खेळीमुळे लीडिंग स्ट्रॉक क्रिकेट अ‍ॅकॅडमीने पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमी ब संघाचा १० गडी राखून सहज पराभव केला. अथर्व सिन्हा याने नाबाद ५० धावांची खेळी करून संघाचा विजय निश्चित केला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमी अः ३० षटकात ९ गडी बाद २३१ धावा (अथर्व कावळे ५९ (४९, ९ चौकार), अमरेंद्र सिंग ४५, राजवीर राऊत ३५, सार्थक पाटील ३१, सम्राट झेंडे ५-३२, ऋतुराज पी. २-३१) वि.वि. क्रिकेट अ‍ॅकॅडमी वाघोलीः २५.५ षटकात १० गडी बाद ९० धावा (आतिश तोबरे ५० (६३, ९ चौकार), वेदांत शेळके २-१२, शिवांश एस. २-१४); सामनावीरः अथर्व कावळे;

पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमी बः २१ षटकात १० गडी बाद १०८ धावा (यतिन शर्मा १८, आरव गिन्ने १५, कृष्णा तलरेजा २-१, अथर्व सिन्हा १-५) पराभूत वि. लीडिंग स्ट्रॉक क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १४.५ षटकात बिनबाद १०९ धावा (अथर्व सिन्हा नाबाद ५० (४७, ९ चौकार), यश पाटील १८); सामनावीरः अथर्व सिन्हा.

Exit mobile version