Site icon Jan Bharat Samachar

जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्चा इयत्ता १२ वी चा निकाल १०० टक्के

Spread the love

पुणे . न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्च्या जाधवर इंग्लिश मीडियम स्कूल अ‍ँड ज्यू. कॉलेज, पॅराडाईज जू. कॉलेज आणि शार्दुल सुधाकरराव जाधवर कॉमर्स अ‍ँड सायन्स ज्युनियर कॉलेज चा इयत्ता १२ वी चा १०० टक्के लागला आहे. संस्थेतील वैदेही कुलकर्णी, कियान जैन, प्रणाली पाटील यानी ८५ टक्क्यांच्या पुढे गुण मिळवित उत्तम यश संपादन केले आहे.

जाधवर ग्रुपचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह सर्व प्राचार्य, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

जाधवर इंग्लिश मीडियम स्कूल अ‍ँड ज्यू. कॉलेजच्या विज्ञान शाखेत वैदेही कुलकर्णी (८५ टक्के), ईशान पवार (८०.१७ टक्के), देवाशीष घोरमाडे (८० टक्के) यांनी तसेच वाणिज्य शाखा इंग्रजी माध्यमात प्राची बाबर (८१.३३ टक्के), अमरनाथ वाघमारे (७९ टक्के), अनिष नेवासकर (७७.१७ टक्के) यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे.

पॅराडाईज जू. कॉलेजमधील विज्ञान शाखेत कियान जैन (८५ टक्के), रिया गोखले (८४.५० टक्के), हर्ष बो-हाडे (८४.१७ टक्के), वाणिज्य शाखा मराठी माध्यमात क्रांती पवार (६८.५० टक्के), मनिषा नेपाली (६६.३३ टक्के), तन्वी तेलंगी (६२.६७ टक्के) यांसह कला शाखेत नेहा लवाटे (६५.६७ टक्के), नंदीनी दगडे (६३.६७ टक्के), जान्हवी भालेराव (६२.३३ टक्के) यांनी उत्तम गुण पटकाविले.

Exit mobile version