Site icon Jan Bharat Samachar

‘पुणे क्रिकेट करंडक’ १३ वर्षाखालील मुलांची आंतरक्लब एकदिवसीय (५०-५० षटकांची) क्रिकेट स्पर्धा !

Spread the love
पीडीसीए अ‍ॅकॅडमी, क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी, महाराष्ट्रीय मंडळ अ‍ॅकॅडमी, चंद्रन पानीकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी कामगिरी !!

पुणे, ९ मेः पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि सागर कांबळे स्पोटर्स मॅनेजमेंट यांच्यावतीने ‘पुणे क्रिकेट करंडक’ १३ वर्षाखालील मुलांच्या आंतरक्लब एकदिवसीय (५०-५० षटकांच्या) क्रिकेट स्पर्धेत पीडीसीए अ‍ॅकॅडमी, क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी, महाराष्ट्रीय मंडळ अ‍ॅकॅडमी आणि चंद्रन पानीकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.

मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत सोहम सावंत याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर पीडीसीए अ‍ॅकॅडमीने क्षेत्रम क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा १५५ धावांनी सहज पराभव केला. पीडीसीए अ‍ॅकॅडमीकडून भुवनेश भोर याने ७० धावांची आणि विरेंद्र शितोळे याने ५३ धावांची खेळी केली. दुसर्‍या सामन्यामध्ये विवान देशमुख याने फटकावलेल्या १३१ धावांच्या जोरावर क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीने स्केलअप अ‍ॅकॅडमीचा ९४ धावांनी पराभव करून आगेकूच केली. विवान देशमुख याने १४३ चेंडूत २१ चौकार आणि २ षटकारांसह १३१ धावा काढल्या.

मयुरेश दिम्बर याने केलेल्या अचूक गोलंदाजीमुळे महाराष्ट्रीय मंडळ अ‍ॅकॅडमीने छत्रपती क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ६ गडी राखून पराभव केला आणि सलग दुसरा विजय मिळवला. मयुरेश दिंम्बर याने १६ धावांमध्ये ४ गडी बाद केले. ऋतुराज एस. याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर चंद्रन पानीकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीने पुणे पोलिस बॉईजचा ५ गडी राखून पराभव केला आणि स्पर्धेत विजयी सलामी दिली.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
पीडीसीए अ‍ॅकॅडमीः ३९.१ षटकात १० गडी बाद २३६ धावा (भुवनेश भोर ७० (८४, ८ चौकार), विरेंद्र शितोळे ५३ (६०, ६ चौकार), चिराग शेंडगे २२, ध्रुव सामल ४-६२) वि.वि. क्षेत्रम क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २५.३ षटकात १० गडी बाद ८१ धावा (दिव्यांश विश्वकर्मा १२, रियांश जोशी ११, सोहम सावंत ३-१०, चिराग शेंडगे २-७); सामनावीरः सोहम सावंत;

क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीः ५० षटकात ८ गडी बाद २३८ धावा (विवान देशमुख १३१ (१४३, २१ चौकार, २ षटकार), समर्थ इंगळे ३४, शर्विल झोंडे ३-३१, आरव पाल २-२९, दक्क्ष राज २-५४) वि.वि. स्केलअप अ‍ॅकॅडमीः २९.५ षटकात १० गडी बाद १४४ धावा (दक्क्ष राज ९६ (९२, १८ चौकार), हर्षल धिडे १६, रोहन यादव ३-१८, विवान देशमुख १-२७); सामनावीरः विवान देशमुख;

छत्रपती क्रिकेट अ‍ॅकॅडमीः ४२.३ षटकात १० गडी बाद १५३ धावा (अर्ध्य सपकाळ ३५, दिपक थोपटे ४३, अर्णव राजपुत २३, मयुरेश दिंम्बर ४-१६, अर्णव खिरीड ३-२४) पराभूत वि. महाराष्ट्रीय मंडळ अ‍ॅकॅडमीः २७.२ षटकात ४ गडी बाद १५४ धावा (सम्यक शहा नाबाद ४० (५३, ४ चौकार), यंश ओस्वाल नाबाद २३, अर्णव खिरीड २२, यतिक लुनावत २१, दिपक थोपटे १-८); सामनावीरः मयुरेश दिम्बर;

पुणे पोलिस बॉईजः १४.३ षटकात ६ गडी बाद ५० धावा (वेदांत मावसकर १८, प्रथमेश शिंदे १२, ऋतुराज ३-९, सिद्धार्थ सावंत १-१) पराभूत वि. चंद्रन पानीकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीः ६.२ षटकात ५ गडी बाद ५४ धावा (अक्क्षत सिंग १९, स्वरा झेंडे २-१६, श्रीयांश कुराळे २-९, अव्देत पाटील १-३); सामनावीरः ऋतुराज एस.

Exit mobile version