Site icon Jan Bharat Samachar

‘पुणे क्रिकेट करंडक’ १३ वर्षाखालील मुलांची आंतरक्लब एकदिवसीय (५०-५० षटकांची) क्रिकेट स्पर्धा !

Spread the love
पुणे. पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि सागर कांबळे स्पोटर्स मॅनेजमेंट यांच्यावतीने ‘पुणे क्रिकेट करंडक’ १३ वर्षाखालील मुलांच्या आंतरक्लब एकदिवसीय (५०-५० षटकांच्या) क्रिकेट स्पर्धेत विजय क्रिकेट अ‍ॅकॅडमी, छत्रपती क्रिकेट अ‍ॅकॅडमी, पीडीसीए अ‍ॅकॅडमी आणि ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.

मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत प्रचित सांगवे याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर विजय क्रिकेट अ‍ॅकॅडमीने पुणे इन्स्टिट्युट ऑफ क्रिकेट संघाचा ६ गडी राखून पराभव केला. प्रचित सांगवे याने २७ धावांमध्ये ३ गडी टिपून अचूक गोलंफाजी केली. गौरवी पंचवारा हिने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे छत्रपती क्रिकेट अ‍ॅकॅडमीने क्षेत्रम क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ३४ धावांनी सहज पराभव केला. फिरकीपटू गौरवी पंचवारा हिने १३ धावांमध्ये सहा गडी बाद करून क्षेत्रम अ‍ॅकॅडमीचा डाव गुंडाळला.

अभास दानी याने केलेल्या गोलंदाजी आणि चिराग शेंडगे याने केेलेल्या नाबाद शतकी खेळीमुळे पीडीसीए अ‍ॅकॅडमीने छत्रपती क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा १२३ धावांनी सहज पराभव केला. स्टिफन शिरोडकर याने केलेल्या अष्टपैलु खेळीमुळे ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमीने क्रिकस्टार रायझिंग अ‍ॅकॅडमीचा ७१ धावांनी पराभव करून विजयी कामगिरी केली.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
पुणे इन्स्टिट्युट ऑफ क्रिकेट (पीआयओसी)ः ४३.३ षटकात १० गडी बाद १५८ धावा (वेदांतिका भागवत ६० (१०१, ८ चौकार), आर्यन खरे २५, प्रचित सांगवे ३-२७, अवनीश एस. २-१५) पराभूत वि. विजय क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २६.५ षटकात ४ गडी बाद १६० धावा (इशान भोईटे नाबाद ६० (८६, ७ चौकार), राजवीर होले ४३, पवन भंडारी २५, अवंतिका भागवत २-२२); सामनावीरः प्रचित सांगवे;

छत्रपती क्रिकेट अ‍ॅकॅडमीः ३६ षटकात १० गडी बाद १४२ धावा (दिपक थोपटे ४१, रौनक चौहान १९, अर्णव राजपुत १४, अर्ध्य सपकाळ १५, दर्श धोपटे ३-२१, इशान देशपांडे २-१७, अस्मि मोकाशी २-२२) वि.वि. क्षेत्रम क्रिकेट अ‍ॅकॅडमीः ३४ षटकात १० गडी बाद १०८ धावा (आरूद शेटपांडे नाबाद ३३, अर्णव जोशी २४, गौरवी पंचवारा ६-१३); सामनावीरः गौरवी पंचवारा;

पीडीसीए अ‍ॅकॅडमीः ४४ षटकात ८ गडी बाद २५७ धावा (चिराग शेंडगे नाबाद १०० (८४, १४ चौकार), भुवनेश भोर ३१, सोहम सावंत २८, श्रोत मराठे २२, कार्तिक पुतगे २-२७) वि.वि. छत्रपती क्रिकेट अ‍ॅकॅडमीः ३६.४ षटकात १० गडी बाद १३४ धावा (दिपक थोपटे २७, अर्ध्य सपकार ३५, अभास दानी ३-१४, सोहम सावंत २-६, शर्विल नाकटे २-१०); सामनावीरः अभास दानी;

ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमीः ४०.५ षटकात १० गडी बाद १७३ धावा (निहाल फरांदे ५३ (५०, ७ चौकार), वीरा निकम २३, स्टिफन शिरोडकर २८, संजय चौहान ३-१४, राज डिके २-३०) वि.वि. क्रिकस्टार रायझिंग अ‍ॅकॅडमीः ३४.३ षटकात १० गडी बाद १०२ धावा (विवान दांगट २८, जय चौधरी ३-१४, अभिज्ञान २-८, शौर्य शेलार २-१४, स्टिफन शिरोडकर २-१७); सामनावीरः स्टिफन शिरोडकर.

Exit mobile version