Site icon Jan Bharat Samachar

‘पीडीएफए लीग’ फुटबॉल स्पर्धा !!

Spread the love
पुणे, १० मेः पुणे जिल्हा फुटबॉल संघटने तर्फे आयोजित ‘पीडीएफए लीग २०२५’ फुटबॉल स्पर्धेच्या प्रथम आणि व्दितीय श्रेणी गटाच्या सामन्यात ईगल एफसी, सिटी एफसी पुणे, उत्कर्ष क्रिडा मंच कोथरूड एफसी, एफसी शिवनेरी, पुणे शहर पोलिस आणि रेंजहिल्स् यंग बॉईज फुटबॉल क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.

कात्रज येथील भारती विद्यापीठ मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या व्दितीय श्रेणी गटाच्या झालेल्या सामन्यामध्ये विपुका येपथोमी, नालो कोमुत आणि गौरव कुमार यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर ईगल एफसी संघाने एफसी जोसेफ संघाचा ३-१ असा पराभव केला. रीथम मलविया याने केेलेल्या एकमेव गोलमुळे सिटी एफसी पुणे संघाने लिजंड्स फुटबॉल अ‍ॅकॅडमीचा १-० असा पराभव केला. उत्कर्ष क्रिडा मंच कोथरूड एफसी ब संघाने युनिक वानवडी एफसीचा १०-० असा एकतर्फी पराभव केला. सामन्यात विरेन भोसले याने तीन गोल तर, हेमंत रावत याने एक गोल केला. हरीकृष्णा अदीगंटाला, आदित्य सिंग आणि देवांश मिश्रा यांनी प्रत्येकी दोन गोल केले. राजेश पवार याने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर एफसी शिवनेरी संघाने पुना सोशल स्पोटर्स क्लबचा २-० असा पराभव केला.

प्रथम श्रेणी गटाच्या सामन्यात पुणे शहर पोलिस संघाने जाएंट्स एफसी अ संघाचा २-१ असा पराभव केला. पुणे शहर पोलिस संघाकडून स्वप्निल चव्हाण आणि मयुरसिंग अधिकारी यांनी गोल नोंदविले. जाएंट्स एफसी अ संघाकडून अन्शुल शर्मा याने गोल केला. दुसर्‍या सामन्यामध्ये रेंजहिल्स् यंग बॉईज फुटबॉल क्लबने रूपाली स्पोटर्स क्लबचा ५-० असा धुव्वा उडविला. निशित हेडगे याने तीन गोल केले. तनिष्क ददलानी आणि आशिष तिडवे यांनी प्रत्येकी एकेक गोल केले.

सामन्यांचा सविस्तर निकालः गटसाखळी फेरीः व्दितीय श्रेणी गटः
१) ईगल एफसीः ३ (विपुका येपथोमी ५३ मि., नालो कोमुत ५८ मि., गौरव कुमार ६० मि.) वि.वि. एफसी जोसेफः १ (गॅरी रॉड्रीक्स् १८ मि.); पुर्वार्धः ०-१;
२) सिटी एफसी पुणेः १ (रीथम मलविया ६५ मि.) वि.वि. लिजंड्स फुटबॉल अ‍ॅकॅडमीः ०; पुर्वार्धः ०-०;
३) उत्कर्ष क्रिडा मंच कोथरूड एफसी बः १० (हेमंत रावत ५ मि., हरीकृष्णा अदीगंटाला ३१, ७० मि., आदित्य सिंग २३, ५९ मि., देवांश मिश्रा ४२, ५१ मि., विरेन भोसले ४८, ५३, ५५ मि.) वि.वि. युनिक वानवडी एफसीः ०; पुर्वार्धः ३-०;
४) एफसी शिवनेरीः २ (राजेश पवार १६, ६७ मि.) वि.वि. पुना सोशल स्पोटर्स क्लबः ०; पुर्वार्धः १-०;

प्रथम श्रेणी गटः
१) पुणे शहर पोलिसः २ (स्वप्निल चव्हाण २४ मि., मयुरसिंग अधिकारी ६१ मि.) वि.वि. जाएंट्स एफसी अः १ (अन्शुल शर्मा ६० मि.); पुर्वार्धः १-०;
२) रेंजहिल्स् यंग बॉईज फुटबॉल क्लबः ५ (तनिष्क ददलानी ५ मि., निशित हेडगे ५५, ६०, ७२ मि., आशिष तिडवे ८४ मि.) वि.वि. रूपाली स्पोटर्स क्लबः ०; पुर्वार्धः १-०;

Exit mobile version