Site icon Jan Bharat Samachar

चौथी ‘स्पोटर्सफिल्ड करंडक’ अजिंक्यपद १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा !!

Spread the love
पुणे, . स्पोटर्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित चौथ्या ‘स्पोटर्सफिल्ड करंडक’ अजिंक्यपद १२ वर्षाखालील २५-२५ षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट अ‍ॅकॅडमीने सलग चौथा तर, किरण क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने दुसरा विजय मिळवून स्पर्धेत आगेकूच केली.
सातारा रस्त्यावरील टेंभेकर फार्म्स अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत आर्यन जोग याने केलेल्या ७४ धावांच्या जोरावर स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट अ‍ॅकॅडमीने ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमीचा ८ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करणार्‍या ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमीने १९० धावा धावफलकावर लावल्या. विराट भिसे याने ७७ चेंडूत १५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद १०९ धावांची खेळी केली आणि संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. हे लक्ष्य स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट अ‍ॅकॅडमीने  २३.२ षटकामध्ये व २ गडी गमावून पूर्ण केले. आर्यन जोग याने ४४ चेंडूत १० चौकारांसह नाबाद ७४ धावांची खेळी केली. त्याला दुसर्‍या बाजुने अनय रानाडे याने नाबाद ५२ धावांची खेळी करून उत्तम साथ दिली. आर्यन आणि अनय या दोघांनी चौथ्या गड्यासाठी यांच्यात ८४ चेंडूत १४१ धावांची अभेद्य भागिदारी रचून संघाचा विजय साकार केला.

सार्थक ढेरे याने केलेल्या अष्टपैलु खेळीमुळे किरण क्रिकेट अ‍ॅकॅडमीने स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लबचा ६१ धावांनी पराभव करून स्पर्धेत दुसरा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करणार्‍या किरण क्रिकेट अ‍ॅकॅडमीने २५ षटकामध्ये १९६ धावांचे लक्ष्य उभे केले. राज नेरकर याने ५२ धावांची खेळी केली. श्री राजगुरू याने ३८ धावांची खेळी करून संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. या लक्ष्याचा पाठलाग करताना स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लबचा डाव १३५ धावांवर मर्यादित राहीला. अविष्कार पाटोले याने ३२ धावांचे योगदान दिले. रूद्र भोसले आणि सार्थक ढेरे यांनी प्रत्येकी तीन गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमीः २५ षटकात २ गडी बाद १९० धावा (विराट भिसे नाबाद १०९ (७७, १५ चौकार, १ षटकार), स्वर नागवडे ३८, स्वरा गाडे २०, कुश मालपाणी १-२१); (भागिदारीः पहिल्या गड्यासाठी स्वर आणि विराट यांच्यामध्ये १०४ (९२); (दुसर्‍या गड्यासाठी स्वरा आणि विराट यांच्यामध्ये ६५ (४५) पराभूत वि. स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २३.२ षटकात २ गडी बाद १९२ धावा (आर्यन जोग नाबाद ७४ (४४, १० चौकार), अनय रानाडे नाबाद ५२ (४७, ५ चौकार, १ षटकार), अंगद सिंग १-२०); (भागिदारीः चौथ्या गड्यासाठी आर्यन आणि अनय यांच्यात १४१ (८४); सामनावीरः आर्यन जोग;

किरण क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २५ षटकात ५ गडी बाद १९६ धावा (राज नेरकर ५२ (६०, ६ चौकार), श्री राजगुरू ३८, सार्थक ढेरे नाबाद १६, आरव कामठे २-२२) वि.वि. स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लबः २५ षटकात ९ गडी बाद १३५ धावा (अविष्कार पाटोले ३२, कार्तिक पासलकर १७, रूद्र भोसले ३-२०, सार्थक ढेरे ३-२५); सामनावीरः सार्थक ढेरे.

Exit mobile version