Site icon Jan Bharat Samachar

जबाबदार आयां चे बेजबाबदार आईच्या विरोधात आंदोलन .

Oplus_16777216

Spread the love

रूपाली चाकणकर राजीनामाची मांग 

पुणे.गेले आठ दिवस पुणे शहरामध्ये वैष्णवी हगवणे हिचा हुंडाबळी हत्या की आत्महत्या यावर सर्व पुण्यामध्ये एक खळबळ माजली आहे. पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. अशावेळी आपल्या मुली बाळींसाठी सरकारने बनवलेले महिला आयोग या आयोगाकडे सर्व पालक सर्व शोषित आणि पीडित महिला न्यायाच्या अपेक्षेने बघत असतात. परंतु सध्याच्या महिला अध्यक्ष राष्ट्रवादीच्या महिला आयोग अध्यक्ष पण आहेत. आणि त्या जेव्हापासून या पदावर विराजमान झाल्यात तेव्हापासून महाराष्ट्रात पुण्यात महिला मुली छोट्या चिमुकल्या यांच्यावर अन्याय अत्याचार घरगुती हिंसा बलात्कार सामूहिक बलात्कार याचे प्रकरण वाढतच चाललंय. महिला आयोगाची भीतीच राहिली नाहीये. कारण या बाई काही कामच करत नाही. यांचं काम म्हणजे झगा बगा आणि मला बघा. खरंतर सहा महिन्यापूर्वी मयुरी हगवणे या महिला आयोगाकडे तक्रार घेऊन गेले असता त्यांना न्याय मिळाला नाही आणि त्यांच्या तक्रारीची दखल पण घेतली गेली नाही. तेव्हा जर महिला आयोगाने क** कारवाई हगवणे कुटुंबावर केली असती किंवा तिच्या नवऱ्यावर तिच्या सासऱ्यावर केली असती तर आज वैष्णवी हगवण्याचा बळी गेला नसता वैष्णवी हगवण्याची हत्या झाली नसती. या हुंडाबळी नंतर जेव्हा पुण्यातील जनता,महिला सामाजिक संस्था आणि मुली यांनी महिला आयोग अध्यक्षांवर टीका केली असता या रूपाली चाकणकर आमच्या महिला आमच्या जनतेला चक्क चिल्लर म्हणतात. त्या म्हणाल्या की सध्या चिल्लर फार वाजायला लागली आहे. या बाईंना लाज नाही वाटत. आपण कोणत्या पदावर बसलो आहे वेळ काय आहे. गेल्या आठ दिवस त्यांना वैष्णवी हगवण्याच्या घरी जायला वेळ पण मिळाला नाही. जेव्हा टीका जोरात चालू झाली तेव्हा या मॅडम त्यांच्या घरी गेल्या अगदी नट्टापट्टा भरजरी साडी नेसून. म्हणजे यांना एका घरामध्ये दुःख झालंय तिथे कसं गेलं पाहिजे तिथे काय बोललं पाहिजे याचं भानच नाहीये. कुठून येतो एवढा माज. तेव्हा आम्ही त्यांच्या या चिल्लर बोलण्याच्या विरोधात आज सकाळी बारा वाजता गुडलक चौकात कलाकार कट्टा येथे थील्लर पे चिल्लर फेको हे आंदोलन घेतले. यावेळी आम्ही महिला आयोग अध्यक्षांच्या फोटोवर चिल्लर टाकून त्यांना चिल्लर चे वजन कसे असते हे दाखवून दिले. यावेळी आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांना मागणी केली की त्यांचा ताबडतोब म्हणजेच या चिल्लर बाईचा जिला महिला आयोग अध्यक्ष पदाची गरिमा सांभाळता आली नाही यांचा ताबडतोब राजीनामा घ्या आणि आमच्या मुलींना न्याय द्या. यावेळी आम्ही त्यांना हेही सांगितले जर आपण राजीनामा घेतला नाही तर आम्ही कलेक्टर कचेरी समोर साखळी उपोषण चालू करू.

या आंदोलनामध्ये संगीता तिवारी शोभा पणीकर सुनिता नेमूर रजिया शेख प्रिया लोंढे कांबळे ताई अशा बऱ्याच महिला उपस्थित होत्या. हे आंदोलन बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गॅंग यांच्यातर्फे घेण्यात आलं.

Exit mobile version